खमताणेच्या ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 05:44 PM2018-08-11T17:44:51+5:302018-08-11T17:45:45+5:30

अवैध वाळू उपसा : कारवाई करण्याचे लेखी आश्वासन

Suspension of hunger strike by villagers | खमताणेच्या ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

खमताणेच्या ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

googlenewsNext
ठळक मुद्देसरपंच शीतल इंगळे, उपसरपंच नितीन वाघ यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सोमवारी तहसीलदार जितेंद्र कुंवर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होतेसोमवारी संबंधित विभागाची बैठक घेण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यातआले.

मुंजवाड : खमताणे येथील आरम नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा थांबविण्यासह नदीपात्रात अतिक्र मण करणाऱ्या ग्रामस्थांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी खमताणे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शुक्र वारी (दि.१०) नदीपात्रातील वाळू उपशाच्या खड्ड्यातच छेडलेले उपोषण रात्री उशिराने लेखी आश्वासन मिळाल्यानंतर स्थगित करण्यात आले.
तहसीलदार जितेंद्र कुवर व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी रात्री उपोषणकर्त्यांशी चर्चा करून यापुढे वाळू वाहतुकीचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे मंडळ निरीक्षकांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्र दिले. तसेच याप्रश्नी येत्या सोमवारी (दि. १३) संबंधित विभागाची तातडीची बैठक बोलविण्याचेही आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी रात्री उशिराने उपोषण मागे घेतले. दरम्यान सरपंच शीतल इंगळे, उपसरपंच नितीन वाघ यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सोमवारी तहसीलदार जितेंद्र कुंवर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. शासनाकडून कारवाई होत नसल्याने उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार पदाधिकारी व ग्रामस्थ सकाळी नदीपात्रात वाळूच्या खड्ड्यात उपोषणास बसले. शुक्रवारी दुपारी नायब तहसीलदार विनोदकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आणि मंडळ निरीक्षक जी.डी. कुलकर्णी यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, ग्रामस्थ व प्रशासनादरम्यान झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आंदोलन सुरूच राहिले. तहसीलदार जितेंद्र कुंवर व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पुन्हा सायंकाळी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. दोन तास समजूत काढण्यात आली तरीही ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेण्यात असमर्थता दर्शविली होती.
उद्या पुन्हा बैठक
आंदोलकांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी तहसीलदारांसह पोलीस निरीक्षकांनी प्रयत्न केले. परंतु, जोपर्यंत कारवाईसंदर्भात लेखी आश्वासन मिळत नाही तोवर मागे न हटण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. अखेर वरिष्ठ स्तरावर चर्चा करून रात्री दहा वाजता आंदोलकांना लेखी आश्वासन देण्यात आले. याप्रश्नी सोमवारी संबंधित विभागाची बैठक घेण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यातआले.

Web Title: Suspension of hunger strike by villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक