नाशिक देवळालीच्या पे अॅण्ड पार्कला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 04:21 PM2018-09-21T16:21:30+5:302018-09-21T16:24:39+5:30
कॅन्टोंमेट प्रशासनाने १६ सप्टेंबर पासून देवळालीतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पे अँन्ड पार्किंगचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. परंतु त्याला व्यापाºयांनी विरोध दर्शवून नाराजी व्यक्त केली होती. गुरवारी व्यापारी वर्गाने देवळाली कँम्प पोलीस स्टेशनला पार्कींग
देवळाली कँम्प : चार दिवसांपुर्वी सुरू करण्यात आलेल्या देवळाली येथील पे अॅण्ड पार्कच्या विरोधात व्यापारी वर्गाने शुक्रवारी कडकडीत बंद पाळून कँन्टोमेंन्ट बोर्डावर मोर्चा काढल्याने तुर्त पे अॅण्ड पार्किंगला स्थगिती देण्यात आली असून, या संदर्भात भूमिका ठरविण्यासाठी कँन्टोमेंन्ट बोर्डाच्या आगामी बैठकीत निर्णय घेण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कॅन्टोंमेट प्रशासनाने १६ सप्टेंबर पासून देवळालीतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पे अँन्ड पार्किंगचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. परंतु त्याला व्यापा-यांनी विरोध दर्शवून नाराजी व्यक्त केली होती. गुरवारी व्यापारी वर्गाने देवळाली कँम्प पोलीस स्टेशनला पार्कींग बाबत निवेदन देऊन पे अँन्ड पार्किंग बंद करण्याची मागणी केली होती. शुक्रवारी या पार्किंगच्या विरोधात शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली या बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर व्यापाºयांनी मोर्चा काढून बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांची भेट घेतली.यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप व व्यापा-यांनी अजय कुमार यांच्याशी चर्चा केली. पार्किंग योजना कशी अव्यवहारी आहे याविषयी माहिती देवून व्यापा-यांना विश्वासात न घेता त्याची अंमलबजावणी सुरू केल्याने व्यवसायावर मोठा परिणाम होत असून, आगामी सण-उत्सव लक्षात घेता याबाबत तातडीने फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर पे अॅण्ड पार्कला तात्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. पे अॅण्ड पार्कचा निर्णय हा संपूर्ण बोर्डाचा असल्यामुळे त्यात फेरबदल करायचे असल्यास बोर्डाच्या सभेतच त्यावर निर्णय घेतला जाईल असे अजय कुमार यांनी सांगितले. तसेच शहराला शिस्त लागावी, शहर सुंदर व स्वच्छ असावे बाहेरुन येणाºया नागरिकांना देवळाली विषय आकर्षण निर्माण व्हावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून, भविष्यात वाढणारी वाहतूक व वाहन संख्या लक्षात घेता पार्किंगचे नियोजन आजच करणे गरजेचे आहे असल्याचे ते म्हणाले. पे अॅण्ड पार्क बाबत बोर्डाच्या अंतीम बैठकीत लोकप्रतिनिधींसह व्यापा-यांच्या प्रतिनिधींनाही पाचारण केले जाईल असे त्यांनी सांगितले. मात्र व्यापाºयांनी देखील आपल्याकडे येणाºया ग्राहकांना वाहन पार्किंग विषयी मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी रतन चावला, प्रकाश केवलानी, उत्तम टाकळकर, संजय गोडसे, हनुमंता देवकर, सादिक कॉन्ट्रॅक्टर, मंगेश गुप्ता, गौतम गजरे, जगदीश गोडसे, सुरेश कदम आदि उपस्थित होते.