सावानाच्या फेरमतमोजणीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:54 AM2017-11-01T00:54:30+5:302017-11-01T00:54:36+5:30

सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणूक फेरमतमोजणी प्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायलयाने गुरुवार (दि. २)पर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी (दि. ३१) सावानाच्या मु. शं औरंगाबादकर सभागृहात या फेरमतमोजणी प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. आता फेरमतमोजणीचे भवितव्य न्यायालयीन लढाईवर अवलंबून आहे. दरम्यान, बेळे यांनी निवडणूक अधिकारी भणगे आणि पराभूत उमेदवार बी. जी. वाघ यांच्यात संगनमत झाल्याने मतपेटी फोडण्याचा घाट घातल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे.

Suspension of respiratory adjustment | सावानाच्या फेरमतमोजणीला स्थगिती

सावानाच्या फेरमतमोजणीला स्थगिती

Next

नाशिक : सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणूक फेरमतमोजणी प्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायलयाने गुरुवार (दि. २)पर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी (दि. ३१) सावानाच्या मु. शं औरंगाबादकर सभागृहात या फेरमतमोजणी प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. आता फेरमतमोजणीचे भवितव्य न्यायालयीन लढाईवर अवलंबून आहे. दरम्यान, बेळे यांनी निवडणूक अधिकारी भणगे आणि पराभूत उमेदवार बी. जी. वाघ यांच्यात संगनमत झाल्याने मतपेटी फोडण्याचा घाट घातल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या निवडणुकीत अवघ्या एका मताने जिंकून आलेल्या जनस्थान पॅनलचे उमेदवार धनंजय बेळे यांनी फेरमतमोजणी विरोधात आक्षेप घेत याबाबत नाशिकच्या न्यायलयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायलयाने मंगळवारी (दि. ३१) हे आदेश दिले आहेत. मंगळवारी सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं.औरंगाबादकर सभागृहात सकाळी ११ वाजता फेरमतमोजणीचे आयोजन करण्यात आले होते, परंतु या फेरमतमोजणीला धनंजय बेळे यांनी आक्षेप घेत ही फेरमतमोजणी करण्याची प्रक्रिया बेकायदेशीर असून, ती थांबावी यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जानुसार न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकारी भणगे, सावाना अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर आणि ग्रंथमित्र पॅनलचे पराभूत उमेदवार बी. जी. वाघ यांना समन्स बजावत मंगळवारी (दि. ३१) न्यायालयात उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते, परंतु असे न करता भणगे यांनी फेरमतमोजणीची प्रक्रिया राबविली. 
एकीकडे फेरमतमोजणीची प्रक्रिया आणि दुसरीकडे न्यायालयात सुरू असलेली सुनावणी असे दोन वेगवेगळे चित्र सावानाच्या सभासदांनी अनुभवले. सकाळी ११ वाजता औरंगाबादकर सभागृहात मतपेट्या आणल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली या मतपेट्या उघडण्यात आल्या आणि मतपत्रिकांचे गठ्ठ्यांचे विलगीकरण करून प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात करण्यातदेखील आली होती, परंतु याच वेळी भणगे यांना ही फेरमतमोजणी प्रक्रिया थांबविण्याच्या सूचना सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर नाशिकचे एस. एस. रास्ते यांच्या सांगण्यावरून फोनवरून दिल्या आणि दुपारी १२.१५ वाजता ही प्रक्रिया भणगे यांनी थांबविली.
ही फेरमतमोजणीची प्रक्रिया का थांबविण्यात आली, अशी विचारणा बी. जी. वाघ यांच्या प्रतिनिधी रूपल वाघ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी भणगे यांच्याकडे करण्यात आल्यानंतर भणगे यांनी मला ही प्रक्रिया थांबविण्याबाबत फोन आल्याचे सांगितले. परंतु अशा प्रकारे मतमोजणी थांबविण्यासाठी लेखी सूचना आवश्यक असल्याची मागणी कायम ठेवत वाघ यांचे प्रतिनिधी अमित पाटील, राहुल हारक यांनी आक्षेप घेतल्याने काहीकाळ यावेळी गोंधळ निर्माण झाला. आणि बी. जी. वाघ यांच्या प्रतिनिधींनी ही प्रक्रिया थांबविल्याची लेखीप्रत मिळावी अशी मागणी केली. निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी अशी लेखी प्रत दिल्यानंतर हा वाद शमला.  प्रतिनिधींचा वाद संपल्यानंतर मतपेट्या भणगे आणि सरकारी कर्मचाºयांच्या हस्ते सिलबंद करण्यात आल्या. मतपेट्यांना सील लावले जात असतानाच श्याम दशपुत्रे आणि दीपक कुलकर्णी यांच्यात मतपेटीला हात लावण्यावरून बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद मिटवण्यात आला.

Web Title: Suspension of respiratory adjustment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.