मागील तारखेने निलंबन रद्द करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:27 AM2018-09-28T00:27:06+5:302018-09-28T00:27:35+5:30

Suspension suspension by previous date | मागील तारखेने निलंबन रद्द करण्याच्या हालचाली

मागील तारखेने निलंबन रद्द करण्याच्या हालचाली

Next
ठळक मुद्देनिलंबित कर्मचाऱ्याबाबत प्रशासनाची सारवासारव

नाशिक : त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयातील कर्मचाºयाला जिल्हाधिकाºयांनी तीन महिन्यांपूर्वी निलंबित केलेले असताना तहसीलदाराने परस्पर सदर कर्मचाºयाला कामावर नेमण्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणताच जिल्हा प्रशासनाने सारवासारव करून सदरची बाब लपविण्याचा प्रयत्नदेखील अंगलट आला आहे. आठ दिवसांपूर्वीच कर्मचाºयाला रुजू करून घेण्याचे आदेश बजावण्यात आल्याचा छातीठोक दावा करणाºया प्रशासनाकडे मात्र कर्मचाºयाचे निलंबन मागे घेतल्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेशच नसल्याचे चौकशीअंति निदर्शनास आले आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हलदर ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख कळविण्यात कुचराई केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाºयांनी जून महिन्यात त्र्यंबकेश्वरचे नायब तहसीलदार कनोजे, लिपिक देशमुख या दोघांनाही निलंबित केले. तथापि, गणेश विसर्जन काळात त्र्यंबकेश्वर तहसीलदारांनी निलंबित लिपिक देशमुख यांना परस्पर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सोपविल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणताच, हादरलेल्या प्रशासनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्र्यंबकेश्वर तहसीलदार व सदर कर्मचाºयाला पाठीशी घालण्याचा भाग म्हणून सदर कर्मचाºयाचे निलंबन आठ दिवसांपूर्वीच मागे घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला. परंतु प्रस्तृत प्रतिनिधीने त्याबाबत चौकशी केली असता, निलंबन मागे घेण्याची टिपणी तयार असून, त्यावर जिल्हाधिकाºयांची स्वाक्षरी झाली की नाही याबाबत कोणीच खात्री दिली नाही. त्यामुळे जर निलंबन मागे घेण्याचे आदेशच पारित झाले नाही तर सदर कर्मचाºयाला पुन्हा विनाआदेशच रुजू करून घेतले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. विशेष म्हणजे निलंबित झालेल्या लिपिकाचे चांदवड मुख्यालय असताना गेल्या तीन महिन्यांत ते तेथे हजर तर झालेले नाहीतच शिवाय प्रशासनाने ज्या कारणावरून निलंबित केले त्या प्रशासनाने कनोजे व देशमुख या दोघांवर दोषारोपपत्रदेखील ठेवलेले नाही. त्यामुळे दोषारोपपत्र न ठेवता निलंबन व आदेश पारित न करताच कामावर रुजू करून घेण्याचे अनोखा प्रकार महसूल खात्यात सुरू झाल्याचे बोलले जात आहे. होलदारनगर ग्रामपंचायत रिक्तज्या होलदारनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तारखा कळविण्यात कुचराई केली म्हणून जिल्हाधिकाºयांनी नायब तहसीलदार व लिपिकास निलंबित केले, त्या होलदारनगर ग्रामपंचायतीसाठी गुरुवारी मतदान होणार होते. परंतु एकाही उमेदवाराने नामांकन न भरल्याने ग्रामपंचायतीसाठी मतदानच घेण्यात आलेले नाही. त्यामुळे एकूणच या साºया प्रकरणाचा गुंता व गूढ आणखी वाढले आहे.

Web Title: Suspension suspension by previous date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.