धान्य घोटाळ्यातील तहसीलदारांच्या निलंबनास स्थगिती

By Admin | Published: June 17, 2015 01:35 AM2015-06-17T01:35:53+5:302015-06-17T01:36:15+5:30

धान्य घोटाळ्यातील तहसीलदारांच्या निलंबनास स्थगिती

Suspension of suspension of tahsildar in grain scam | धान्य घोटाळ्यातील तहसीलदारांच्या निलंबनास स्थगिती

धान्य घोटाळ्यातील तहसीलदारांच्या निलंबनास स्थगिती

googlenewsNext

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या सुरगाणा धान्य घोटाळ्यातील सातही तहसीलदारांच्या निलंबनास स्थगिती देण्याचा निर्णय ‘मॅट’ने घेतला असून, पुढील सात दिवसांत त्यांना त्याच पदावर कामावर रुजू होण्याचे प्रतिज्ञापत्र सरकारने मॅटकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. धान्य घोटाळाप्रकरणी विधानसभेत तहसीलदारांसह १६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. शासनाच्या या निर्णयाविरोधात तहसीलदार संघटनेने लगेचच मुख्यमंत्री, सचिव, राज्यपाल यांच्या भेटी घेऊन निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, सरकार निर्णयावर ठाम राहिल्याने तहसीलदारांनी याप्रकरणी मॅटकडे धाव घेत निलंबन करताना आमची बाजू ऐकून घेतली जावी, अशी मागणी केली. त्यानुसार मॅटमध्ये सुनावणी सुरू झाली. याप्रकरणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शासनाने पाच सदस्यीय चौकशी समिती नेमून त्याबाबतचा अहवाल गेल्या गुरुवारीच (दि.११) मॅटसमोर सादर केला, तसेच अधिकाऱ्यांचाही युक्तिवाद ऐकण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी (दि.१२) मॅटकडून निकाल येणे अपेक्षित होते. मात्र, मुख्य सरकारी वकील हजर नसल्याने सरकारची बाजू मांडली गेली नाही. अखेर या संपूर्ण प्रकरणाचा युक्तिवाद सोमवारी (दि.१५) झाल्याने त्याबाबतचा निर्णय मंगळवारी सकाळी ११ वाजता देण्यात आला. त्यानुसार या घोटाळ्याप्रकरणी सरकारने कारवाई केलेल्या सातही तहसीलदारांच्या निलंबनास स्थगिती देण्यात आली आहे.

Web Title: Suspension of suspension of tahsildar in grain scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.