मुद्रणालयातील दोघा कामगारांचे निलंबन रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:04 AM2018-06-14T01:04:41+5:302018-06-14T01:04:41+5:30

चलार्थपत्र मुद्रणालयात सहा दिवसांपूर्वी अधिकारी व कामगार नेत्यांमध्ये झालेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर निलंबन करण्यात आलेल्या दोघा कामगारांचे बुधवारी निलंबन रद्द करण्यात आले आहे. दरम्यान दिल्लीहून आलेल्या त्रिसदस्यीय समितीने अधिकारी, कामगारांचे जबाब घेऊन सविस्तर चौकशी करून माहिती घेतल्याचे वृत्त आहे.

Suspension of two employees of the press | मुद्रणालयातील दोघा कामगारांचे निलंबन रद्द

मुद्रणालयातील दोघा कामगारांचे निलंबन रद्द

Next

नाशिकरोड : चलार्थपत्र मुद्रणालयात सहा दिवसांपूर्वी अधिकारी व कामगार नेत्यांमध्ये झालेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर निलंबन करण्यात आलेल्या दोघा कामगारांचे बुधवारी निलंबन रद्द करण्यात आले आहे. दरम्यान दिल्लीहून आलेल्या त्रिसदस्यीय समितीने अधिकारी, कामगारांचे जबाब घेऊन सविस्तर चौकशी करून माहिती घेतल्याचे वृत्त आहे.  चलार्थपत्र मुद्रणालयात गेल्या शुक्रवारी कॅन्टीनजवळील गटारीच्या निकृष्ट कामावरून अधिकारी व कामगारांमध्ये वादविवाद होऊन प्रकरण हातघाईपर्यंत गेले होते. घडलेल्या घटनेची माहिती दिल्लीतील मुद्रणालय महामंडळाच्या संचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर मजदूर संघाचे कार्यकारिणी सदस्य एस.जी. घुगे, जी.वाय. काळे या दोन कामगारांचे सोमवारी निलंबन करण्यात आले होते. निलंबन रद्द करावे या मागणीसाठी मंगळवारी दोन्ही प्रेसमध्ये दोन तास कामबंद आंदोलन करण्यात आले.  मंगळवारी दुपारी या घटनेची चौकशी करण्याकरिता दिल्लीहून मुद्रणालय महामंडळाचे अतिरिक्त व्यवस्थापक विजय गुप्ता, एचआर व्यवस्थापक दुर्गा प्रसाद, ए.के. श्रीवास्तव ही त्रिसदस्यीय समिती दाखल झाली. चौकशीसाठी आलेल्या अधिकाºयांनी व्यवस्थापनाशी चर्चा करून सर्व माहिती घेत संबंधित अधिकाºयांचे जबाब नोंदवून घेतले. तर सायंकाळी उशिरा निलंबित करण्यात आलेल्या दोघा कामगारांचेदेखील जबाब नोंदविले. कामगारांवर केलेली निलंबनाची कारवाई मागे घ्यावी याकरिता मजदूर संघाचे पदाधिकारी त्रिसदस्यीय समिती व मुद्रणालय व्यवस्थापनाशी चर्चा करीत होते.  कामगारांचे निलंबन रद्द करावे, भ्रष्टाचार बंद करावा या मागणीसाठी बुधवारी दुपारच्या सुट्टीत कामगारांनी दोन्ही मुद्रणालय महाप्रबंधक यांच्या कार्यालयासमोर घोषणा देत निदर्शने केली. तर त्रिसदस्यीय समितीच्या अधिकाºयांनी घेतलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेऊन चौकशी केली. दरम्यान, मुद्रणालय व्यवस्थापनाकडून दोन्ही कामगारांचे निलंबद रद्द केल्याची आॅर्डर काढली. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुद्रणालय अधिकारी व कामगारांमध्ये झालेला तणाव कमी होण्यास मदत झाली.

Web Title: Suspension of two employees of the press

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक