संशयास्पद लिकेज ;आता थेट पाइपलाइन फोडूनच इंधन चोरीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:57 AM2017-12-10T00:57:17+5:302017-12-10T00:59:40+5:30

पूर्वी टँकर्समधून इंधन चोरीचे प्रकार घडायचेत. त्यासाठी जिल्ह्यातील घाटनदेवी परिसरासारखे काही अड्डे प्रसिद्धही होते. पण काळ बदलला तसे चोरीचे तंत्रही बदलले म्हणायचे. आता थेट पाइपलाइन फोडूनच इंधन चोरीचे प्रयत्न होऊ लागले आहेत. पानेवाडीतील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनची मनमाड-मुंबई दरम्यानची डिझेल पाइपलाइन निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे फोडण्याचा प्रकार तशातलाच म्हणता यावा.

Suspicious Lycose; Now try to steal fuel directly from the pipeline | संशयास्पद लिकेज ;आता थेट पाइपलाइन फोडूनच इंधन चोरीचे प्रयत्न

संशयास्पद लिकेज ;आता थेट पाइपलाइन फोडूनच इंधन चोरीचे प्रयत्न

Next
ठळक मुद्देसंशयास्पद लिकेजआता थेट पाइपलाइन फोडूनच इंधन चोरीचे प्रयत्न

पूर्वी टँकर्समधून इंधन चोरीचे प्रकार घडायचेत. त्यासाठी जिल्ह्यातील घाटनदेवी परिसरासारखे काही अड्डे प्रसिद्धही होते. पण काळ बदलला तसे चोरीचे तंत्रही बदलले म्हणायचे. आता थेट पाइपलाइन फोडूनच इंधन चोरीचे प्रयत्न होऊ लागले आहेत. पानेवाडीतील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनची मनमाड-मुंबई दरम्यानची डिझेल पाइपलाइन निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथे फोडण्याचा प्रकार तशातलाच म्हणता यावा.
मनमाडनजीकच्या पानेवाडी येथील प्रकल्पातून लगतच्या सहा राज्यांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केला जातो. त्यासाठी मुंबई-पानेवाडी दरम्यान जमिनीत ८ ते १0 फूट खोलीवर पाइपलाइन टाकण्यात आली आहे. इंधन चोरांनी अगदी दहा फुटांचा खड्डा खोदून व चक्क ड्रिल मशीनद्वारे ही पाइपलाइन फोडली आहे, यावरून या क्षेत्रातील इंधन माफियांचे तंत्रही कसे विकसित झाले आहे व त्यांचे धाडसही किती बळावले आहे याचा अंदाज बांधता यावा. विशेष म्हणजे खानगाव थडीतील प्रकाराच्या दोनच दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातही असाच प्रयत्न केला गेला. त्यामुळे इंधन माफियांची आंतरराज्यीय टोळीच कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जाणे स्वाभाविक ठरले आहे. काही वर्षांपूर्वी याच प्रकल्पाच्या परिसरात यशवंत सोनवणे नामक वरिष्ठ दर्जाच्या महसूल अधिकाºयाचा जाळून खून करण्यात आला होता. त्यानंतर बºयापैकी खबरदारीचे उपाय योजले गेले होते. जेवणाच्या ढाब्यांवर टँकरमधून इंधन चोरीचे प्रकार चालायचे, त्यामुळे यावर करडी नजर ठेवली गेल्याने या परिसरातील अनेक ढाबेही बंद पडलेत. पण म्हणून इंधन माफियांनी त्यांचे काळे धंदे सोडले नाहीत. त्यांनी थेट प्रकल्पाची पाइपलाइनच फोडण्याची करामत करून दाखविली. त्यामुळे आता याहीदृष्टीने उपाययोजनांवर लक्ष दिले जाणे गरजेचे ठरले आहे. यात सद्यस्थितीत पाइपलाइन फोडली गेल्यावर त्याची माहिती मिळण्याची व्यवस्था आहे. परंतु ही झाली पश्चात व्यवस्था. याऐवजी देशभर अंथरल्या जाणाºया गॅस पाइपलाइनच्या संरक्षणासाठी ज्याप्रमाणे गॅस अ‍ॅथोरिटी आॅफ इंडिया (गेल)कडून या पाइपलाइनच्या आसपास फिरकणाºयांचीही माहिती मिळण्याचे जे ‘बाइवरेशन डिटेक्शन’ तंत्र वापराचे प्रयत्न सुरू आहेत, तशीच यंत्रणा पानेवाडीतील डिझेल-पेट्रोल पाइपलाइनच्या बाबतीतही कार्यान्वित करता येईल का हे बघितले जाणे गरजेचे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा विषय केवळ इंधन चोरी व भेसळ असा मर्यादित नाही. अशा प्रयत्नातून जे पेट्रोल-डिझेल जमिनीत मुरते तसेच परिसरातील विहिरीत उतरून लगतच्या नदीतही मिसळते, त्याने होणारी पर्यावरणाची हानी तसेच जलचरांच्या जीविताला होणारा धोका व शेतकरी बांधवांवर ओढवणारी नापिकी यासारख्याही काही बाबी गंभीर ठरणाºया आहेत. खानगाव थडीला झालेल्या इंधन चोरीच्या प्रयत्नातूनही असेच घडून आले आहे. त्यामुळे चोरीचा गुन्हा नोंदविला गेला असला आणि त्यादृष्टीने पोलिसी तपासाची चक्रे फिरू लागली असली तरी, ज्या परिसरात इंधन लिकेज झाले आहे व ते विहिरीच्या पाण्यातही उतरलेले दिसून येत आहे त्याच्या चौकशीचे, पंचनाम्याचे व त्यातून ओढवणाºया नुकसानीचे काय; असा प्रश्न कायम आहे. तेव्हा इंधनमाफियांची वाढलेली हिंमत पाहता पेट्रोल-डिझेल वाहिनी फोडण्याचे प्रकार टाळण्यासंदर्भात उपाययोजना करतानाच इंधनाच्या झिरप्याने होणाºया शेतजमिनीच्या नुकसानीचाही विचार कंपनीकडून केला जाणे अपेक्षित आहे.

Web Title: Suspicious Lycose; Now try to steal fuel directly from the pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.