जिव्हाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुयोग गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 04:11 PM2020-07-04T16:11:36+5:302020-07-04T16:13:04+5:30
कसबे सुकेणे : ओझर-सुकेणे परिसरातील महत्वाची समजली जाणारी जिव्हाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे निफाड विधानसभा अध्यक्ष सुयोग कैलास गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कसबे सुकेणे : ओझर-सुकेणे परिसरातील महत्वाची समजली जाणारी जिव्हाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे निफाड विधानसभा अध्यक्ष सुयोग कैलास गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचातीचे विद्यमान उपसरपंच कैलास वणवे यांनी ठरलेला आवर्तन पद्धतीने मुदतीत आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त झाले होते. निवड प्रक्रि येसाठी सरपंच निर्मला पागेरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यची बैठक झाली. त्यात ठरलेल्या मुदतीत सुयोग गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सुयोग्य गायकवाड यांची उपसरपंचपदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. सूचक म्हणून सीमा पागेरे होत्या.
याप्रसंगी उपसरपंच कैलास वणवे, सदस्य सीमा पागेरे, रु पाली गायकवाड, लक्ष्मीबाई वारडे. संतोष लोखंडे, सुरेश जाधव, तार्ई लोखंडे, मीना पवार, ग्रामसेवक श्रीमती जे. एच.जेठवा, सिताराम गायकवाड, रावसाहेब पागेरे, किशोर पागेरे, पोपटराव गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, धनाजी गायकवाड, रामनाथ पागेरे, संजय सांगळे, अरु ण लोखंडे, संदीप ससाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.