स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:26 AM2018-07-17T01:26:08+5:302018-07-17T01:26:26+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईकडे दूध घेऊन जाणाऱ्या टँकरला सिन्नर-घोटी महामार्गावर कोनांबे फाट्याजवळ रोखले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ८ ते १० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सिन्नर पोलीस ठाण्यात आणले.

 Swabhimani activists took possession | स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

Next

सिन्नर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईकडे दूध घेऊन जाणाऱ्या टँकरला सिन्नर-घोटी महामार्गावर कोनांबे फाट्याजवळ रोखले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ८ ते १० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सिन्नर पोलीस ठाण्यात आणले.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने मुंबईला जाणारे दूध रोखण्यासाठी रविवारपासून आंदोलनास प्रारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर सिन्नरहून घोटीकडे जाणाºया दुधाच्या टॅँकरला पोलीस बंदोबस्त देण्यात येत आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सोमवारी सकाळी घोटी व कसारा घाटात दुधाचे टॅँकर रोखण्यासाठी गेले होते. घोटी येथे आंदोलन झाल्यानंतर सिन्नर तालुक्यातील कार्यकर्ते पुन्हा सिन्नरकडे येत असताना त्यांना सिन्नरकडून मुंबईकडे गोदावरी संघाचे चार टँकर दिसले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टँकर अडवून धरले. टॅँकर सोबत पोलीस बंदोबस्त होताच मात्र काही वेळातच सिन्नरच्या जादा पोलिसांची कुमकही दाखल झाली.  पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी यांच्यासह राज्य राखीव दलाच्या तुकडीसह स्थानिक पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला केले. पंचायत समिती सदस्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, बारकू पगार, शांताराम पगार, धनंजय निरगुडे, वसंत पगार, कृष्णा घुमरे, विलास निरगुडे, विश्वनाथ पगार, कैलास शिंदे, बाबासाहेब पगार यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलीस वाहनात बसवून ठाण्यात आणण्यात आले. गोदावरी संघाच्या चार टँकरसह कोपरगाव येथून आलेल्या दोन टँकरांनाही सायंकाळी पोलीस बंदोबस्तात घोटीच्या दिशेने रवाना करण्यात आले.

Web Title:  Swabhimani activists took possession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.