स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा बॅँकेवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:22 AM2018-03-16T00:22:19+5:302018-03-16T00:22:19+5:30
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने मार्चअखेर कर्जदार शेतकऱ्यांकडील वसुलीसाठी त्यांची वाहने व मालमत्ता जप्तीचा धडाका सुरू केल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी जिल्हा बॅँकेच्या मुख्य कार्यालयाला धडक देत कुलूप लावण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने बॅँकेसमोर निदर्शने करण्यात आली.

यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाºयांनी बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही सादर केले. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या अध्यक्षांनी कर्जवसुली मोहीम हाती घेऊन त्यासाठी तालुकानिहाय बैठकांचे आयोजन केले असून, बॅँकेच्या अधिकारी, कर्मचाºयांकडून शेतकºयांच्या घरी जाऊन पैशांसाठी दमदाटी केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
यावेळी पदाधिकाºयांनी बॅँकेच्या मुख्य पायºयांवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, दीपक पगार, संदीप जगताप, हंसराज वडघुले, सोमनाथ बोराडे, नाना ताकाटे, सुभाष अहिरे, निवृत्ती गारे, साहेबराव मोरे, निवृत्ती खालकर, श्रावण देवरे, भाऊसाहेब तासकर आदी सहभागी झाले होते. या आहेत मागण्या़़़शेतकºयांची सक्तीची सुलतानी पद्धतीची कर्जवसुली थांबवावी, शेतकºयांच्या ट्रॅक्टरचे लिलाव थांबवून शेतकºयांना ट्रॅक्टर परत देण्यात यावे, सन २००३ ते २०१४ या कालावधीत शेतकºयांना कर्जवाटप करताना त्याची मंजुरी १३ ते १४ लाख रुपयांची असून, शेतकºयांनी ट्रॉलीसाठी कर्ज घेतलेले नसताना त्यांच्या नावावर जास्तीचे कर्ज कसे दाखविण्यात आले याची माहिती द्यावी, बॅँकेच्या संचालकांच्या कर्जाची माहिती प्रसारित करून त्याबाबत श्वेतपत्रिका काढावी, कर्जमुक्तीचा शासन निर्णय असताना व्याज, दंड व सरचार्जेस या दंडात्मक कारवाया थांबवाव्यात आदी मागण्यांचा यात समावेश आहे़