स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कर्जवसुलीप्रश्नी निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:14 AM2021-03-05T04:14:49+5:302021-03-05T04:14:49+5:30
निवेदनात म्हटले आहे, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज सक्तीने वसूल करत आहे. तर ...
निवेदनात म्हटले आहे, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज सक्तीने वसूल करत आहे. तर महावितरण कंपनीही थकीत वीजबिलांसाठी वीज खंडित करत सक्तीने वसुली करत आहेत. यामुळे आधिच अडचणीत असलेला शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. शासनाने कर्ज वसुली थांबवून बिलासाठी वीज खंडित न करता दिलासा द्यावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात बंद असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभही शेतकऱ्यांना देण्यात यावा, शेतकऱ्यांनी स्वत: पैसे खर्च करून उभ्या केलेल्या कांदाचाळ प्रकल्प प्रकल्पास तत्काळ मंजुरी देऊन संबंधित शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे, भरलेला पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, आदी मागण्याही सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख श्रावण देवरे, तालुकाध्यक्ष रवींद्र तळेकर, युवा अध्यक्ष मच्छींद्र जाधव, उपाध्यक्ष किरण बारे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो- ०४ स्वाभिमानी निवेदन
वीज व कर्जवसुली प्रश्नी तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.
===Photopath===
040321\04nsk_25_04032021_13.jpg
===Caption===
फोटो- ०४ स्वाभिमानी निवेदन वीज व कर्जवसुली प्रश्नी तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.