इंधन दरवाढीच्या विरोधात ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:58 AM2018-05-23T00:58:20+5:302018-05-23T00:58:20+5:30

केंद्रातील भाजपा सरकारने इंधन दरवाढीचा करून देशातील जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करीत मंगळवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रुग्णवाहिका ढकलत आणून इंधन दरवाढीचा निषेध केला.

Swabhimani's agitation against fuel price hike | इंधन दरवाढीच्या विरोधात ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

इंधन दरवाढीच्या विरोधात ‘स्वाभिमानी’चे आंदोलन

Next

नाशिक : केंद्रातील भाजपा सरकारने इंधन दरवाढीचा करून देशातील जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करीत मंगळवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रुग्णवाहिका ढकलत आणून इंधन दरवाढीचा निषेध केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्वत:ची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर उभे करून या वाहनांची जबाबदारी सरकारने घ्यावी, असे फलकही झळकाविले. पेट्रोल- डिझेलची दरवाढ ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांवर अवलंबून असली तरी सरकारने प्रयत्न केले तर दरवाढ आटोक्यात येऊ शकते. पण या सरकारला ते करण्याची इच्छा दिसत नाही. मोदींच्या गुजरातमध्ये जर इंधनाचे दर कमी होऊ शकता तर महाराष्टत का नाही? असा सवाल याावेळी करून स्वाभिमानी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावरच जोरदार निदर्शने करत राज्य व केंद्र शासनाचा निषेध केला. गेल्या काही महिन्यांत इंधनाचे दर दहा-पंधरा रुपयांनी वाढल्याने वाहन चालविणे कठीण होऊन बसले आहे.  या आंदोलनात हंसराज वडघुले, नितीन रोटे पाटील, मनोज भारती, सुधाकर मोगल, सोमनाथ बोराडे, योगेश कापसे, शरद लभडे, दर्शन बोरस्ते, विक्रम गायधनी, अ‍ॅड. वायचळे, नीलेश कुसमाडे आदी सहभागी झाले होते.  पेट्रोलचे दर आज प्रतिलिटर ८४.७८ रुपये, तर डिझेल ७१.४८ इतके झाले आहे. मोदींनी महागाई नियंत्रणाचे दिलेले आश्वासन फोल ठरले असून, ग्राहकांची मोठी लूट केली जात आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमती रोज बदलल्या जातील असे केंद्र सरकारने जाहीर केले. त्यामुळे दर कमी जास्त होतील अशी सामान्यजनांची अपेक्षा होती. मात्र ते उलटच झाले. त्यामुळे सरकारने सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचे काम प्रथम बंद करावे, अशी भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

Web Title: Swabhimani's agitation against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.