चायनामेडऐवजी स्वदेशीने उजळणार दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:35 AM2017-10-14T00:35:22+5:302017-10-14T00:35:28+5:30

आठवड्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळीची तयारी घरोघरी जोरात सुरू असताना बाजारपेठाही वस्तू आणि माणसांनी गजबजून गेल्या आहेत. दिवाळीसाठी अगणित वस्तूंची खरेदी केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात या वस्तू आकर्षक वेष्टनात, सवलतीत दाखल झाल्या असून, आजवर भारतीय बाजारपेठेत असलेले चिनी वस्तूंचे वर्चस्व पूर्णत: मोडीत निघाले असून, ग्राहक भारतीय बनावटीच्या वस्तूंची मागणी करत आहेत.

Swadeshi will brighten instead of China's Diwali | चायनामेडऐवजी स्वदेशीने उजळणार दिवाळी

चायनामेडऐवजी स्वदेशीने उजळणार दिवाळी

Next

नाशिक : आठवड्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळीची तयारी घरोघरी जोरात सुरू असताना बाजारपेठाही वस्तू आणि माणसांनी गजबजून गेल्या आहेत. दिवाळीसाठी अगणित वस्तूंची खरेदी केली जात असल्याने  मोठ्या प्रमाणात या वस्तू आकर्षक वेष्टनात, सवलतीत दाखल झाल्या असून, आजवर भारतीय बाजारपेठेत असलेले चिनी वस्तूंचे वर्चस्व पूर्णत: मोडीत निघाले असून, ग्राहक भारतीय बनावटीच्या वस्तूंची मागणी करत आहेत.  मेनरोड, पंचवटी, रविवार पेठ आदी मुख्य बाजारपेठेसह शहरातील सर्व उपनगरांमध्ये चिनी वस्तूंचे गारुड दिसत असले तरी गणेशोत्सवातही चिनी माल विशेषत: लायटिंग माळा, हॅलोजन, फोकस आदींना उठावच मिळालेला नाही. दिवाळीतही लोकांनी चिनी मालाकडे पाठ फिरवली आहे. कोणतीही खात्री नसताना माफक किंमत एवढेच वैशिष्ट असणाºया या चिनी बनावटीच्या वस्तूंना आजवर नाशिककरांची प्रथम पसंती मिळत होती. पण सीमेवरील जवानांना पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून होणारा त्रास, त्यांना चीनकडून मिळणारा पाठिंबा अशा घडामोडींमुळे ग्राहकांनी आपला मोर्चा स्वदेशी वस्तूंकडे वळविला आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लायटिंगच्या माळा, आकाशकंदील, पणत्यांची माळ, फटाके, हॅलोजन ट्यूब, डिफ्यूजर, आबालवृद्धांसाठीचे गिफ्ट, फळे, फटाके फोडण्याची बंदूक, दिवे आदी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे. माफक दर, आवडीचे रंग, आकर्षक रंग यामुळे स्वदेशी वस्तू नाशिककरांना आकर्षित करण्यात यशस्वी होत आहेत. आजवरच्या ग्राहकांच्या मागणीनुसार विक्रेत्यांना दुकानांमध्ये चिनी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणून ठेवल्या असल्या तरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मालाला अजिबात उठाव नसल्याचा सूर ऐकू येत आहे. त्याऐवजी स्वदेशी बनावटीच्या वस्तू दोन पैसे जास्त मोजावे लागले तरी घेण्याकडे कल दिसून येत आहे.

Web Title: Swadeshi will brighten instead of China's Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.