भरदिवसा युवकाचा खून

By admin | Published: May 16, 2016 11:57 PM2016-05-16T23:57:38+5:302016-05-17T00:09:35+5:30

रविवार पेठेतील घटना : गुंडांचा अर्धा तास धुडगूस

Swadeshi youth's murder | भरदिवसा युवकाचा खून

भरदिवसा युवकाचा खून

Next

 नाशिक : सिडकोच्या स्टेट बँक चौकातील दोघांच्या खुनास चार दिवसांचा कालावधी उलटत नाही तोच जुन्या भांडणाची कुरापत काढून तडीपार गुंडाने त्याच्या साथीदारासह रविवार पेठेतील एका युवकाच्या डोक्यात विटा मारून त्याचा खून केल्याची घटना रविवारी (दि़१५) दुपारच्या सुमारास घडली़ मयत युवकाचे नाव स्वागत चंद्रकांत कन्सारा (२७, समर्थ संकुल, जुनी तांबट लेन, रविवार पेठ) असे आहे़ विशेष म्हणजे कन्साराच्या खुनानंतर या दोघा गुंडांनी या परिसरात सुमारे अर्धा तास दहशत निर्माण केली होती़ सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार पेठेतील मल्हारगेट पोलीस चौकीच्या पाठीमागील पारावर स्वागत कन्सारा व संशयित रोहित ऊर्फ चिमण्या दिनकर सापटे (२७, शिवाजीनगर, सातपूर), श्रीकांत ऊर्फ सनी सुनील पगारे (२४, मल्हारगेट पोलीस चौकीमागील पाराजवळ) हे दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास गप्पा मारत होते़ याठिकाणी संशयित व कन्सारा यांच्यामध्ये मागील भांडणाच्या कारणावरून वाद झाले़ यानंतर संशयित सापटे व पगारे या दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जवळच सुरू असलेल्या बांधकामावरील विटा कन्साराच्या डोक्यात मारल्या़ यामध्ये गंभीर जखमी होऊन कन्सारा रक्ताच्या थारोळ्यात पडला असता सापटे व पगारे यांनी परिसरात वाहनावर फिरून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली़ तसेच पोलिसांना माहिती देणाऱ्याचेही हेच हाल केले जातील, अशी दमबाजी करून कन्साराचा मोबाइल घेऊन पसार झाले़ या दोघांचा सुमारे अर्धा तास परिसरात धुमाकूळ सुरू होता़ यानंतर नागरिकांनी एका रिक्षामध्ये कन्सारा यास टाकून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री दोन वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले़ घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ़ सीताराम कोल्हे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले़ तसेच रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास रोहित सापटे व सनी पगारे या दोघाही संशयितांना अटक केली़

Web Title: Swadeshi youth's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.