विवेक, विचाराच्या सहाय्याने मानवाने स्वत:चा उद्धार करायाचा स्वामी स्वरूपानंद सरस्वती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:49 AM2017-11-10T00:49:52+5:302017-11-10T00:50:36+5:30
विवेक, विचाराच्या सहाय्याने मानवाने स्वत:चा उद्धार करावयाचा आहे. मानवाने मनामध्ये कुठल्याही प्रकारचा नकारात्मक विचार आणता कामा नये, कारण जीवनात यशस्वी होत असताना, यशोशिखरे सर करताना प्रतिबंध येत असतात. या प्रतिबंधांवर व अडथळ्यांवर सकारात्मक विवेकशक्तीने मात करावी, असे प्रतिपादन वेदांताचे भाष्यकार व श्रुतिसागर आश्रमाचे परमाचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.
नाशिक : विवेक, विचाराच्या सहाय्याने मानवाने स्वत:चा उद्धार करावयाचा आहे. मानवाने मनामध्ये कुठल्याही प्रकारचा नकारात्मक विचार आणता कामा नये, कारण जीवनात यशस्वी होत असताना, यशोशिखरे सर करताना प्रतिबंध येत असतात. या प्रतिबंधांवर व अडथळ्यांवर सकारात्मक विवेकशक्तीने मात करावी, असे प्रतिपादन वेदांताचे भाष्यकार व श्रुतिसागर आश्रमाचे परमाचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.
शिवशक्ती ज्ञानपीठ व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर रोडवरील कूर्तकोटी सभागृहात आयोजित सुश्राव्य व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुरुवारी (दि. ९) सरस्वती यांनी गुंफले. ‘मनोनिग्रह’ या विषयावर बोलताना ते म्हणाले, या जगात कोणाचेही जीवन सुलभ व सुखी नाही, हे लक्षात घ्यावे. मनाच्या संकल्पावर मानवाची क्रिया अवलंबून असते, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे संकल्प शुद्ध असला तर क्रियाही शुद्ध स्वरूपाचीच घडते. मनाचा वापर चांगल्याप्रकारे केल्यास त्याचे परिणामही चांगले दिसतात. मानवाला सर्वाधिक त्रास हा त्याच्या मनापासून होत असतो. मात्र मानव त्याच्या वेदनांवरील उपाय अंतर्मुख होऊन शोधत नाही तर बहिर्मुख होऊन शोधत फिरतो अन् तो येथेच चुकतो, हे समजून घेण्याची गरज असल्याचे सरस्वती म्हणाले. येत्या रविवारी या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे.