नांदगावला रस्त्यांवर दलदल, घाण-कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:17 AM2021-09-14T04:17:00+5:302021-09-14T04:17:00+5:30

नांदगाव : सहा दिवसांपूर्वी ७ सप्टेंबर रोजी आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना अद्याप नागरिक व प्रशासन करत असून ...

Swamps, dirt-garbage on the roads to Nandgaon | नांदगावला रस्त्यांवर दलदल, घाण-कचरा

नांदगावला रस्त्यांवर दलदल, घाण-कचरा

Next

नांदगाव : सहा दिवसांपूर्वी ७ सप्टेंबर रोजी आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना अद्याप नागरिक व प्रशासन करत असून रस्त्यावर दलदल व नदीपात्रात तसेच तीरावर साचलेला कचरा, घाण आदी सफाईचे काम सुरू आहे. सदर कामास गती मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सन २००९च्या पुरापूर्वीची स्थिती आणि २०२१ मधील पुरापूर्वीची स्थिती, या दोहोंमधला १२ वर्षांचा काळ याची चर्चा नागरिक करत आहेत. २००९च्या आपत्तीनंतर कोणताही धडा कोणीही घेतला नसल्याचे दिसून येते. प्रशासकीय पातळीवर दहा वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणाची एकमेव नोंद नगरपरिषदेकडे असून त्यात शहरात ७५ टपऱ्या असल्याचे म्हटले आहे. दहा वर्षांत टपऱ्या वाढल्या किी घटल्या याची तुलना कशी करायची, हा प्रश्न आहे. या काळात एकदाही अतिक्रमणे हटविण्यासाठी मोहीम आखण्यात आल्याची नोंद नाही किंवा नव्याने सुरू असलेली अतिक्रमणे थांबविण्याचे प्रयत्न नाहीत.

२००९ पूर्वी शाकांबरी ते लेंडी नदीपर्यंत पूल नव्हता. तेव्हा नदीपात्रालगत अतिक्रमणे झाली होती. जी पुरात जमीनदोस्त झाली. त्यानंतर सुमारे साडेचार कोटींचा नवा पूल झाला. त्यावर स्वतंत्र पादचारी मार्ग तयार झाला. गेल्या सात-आठ वर्षात गावाकडच्या बाजूने अनेक टपऱ्या, दुकाने, आरसीसी बांधकामे झाली. पुलाचा कठडा अडीच इंची लोखंडी पाइप व इतर लोखंडी सामग्री वापरून बनविण्यात आला होता. ते पाइप दिवसा कापून त्यामागे दुकाने थाटण्यात आली. दुकानातले विक्रीचे सामान व लोखंडी मांडण्या पादचारी मार्गावर बिनधास्त ठेवले जाते. तेथून पादचाऱ्यांना मार्ग काढणे अवघड होते. अनेक वर्षे नागरिकांची अशी सर्कस सुरू आहे. पुलावर वाहनांची संख्या पूल जणू वाहनतळ वाटावा अशी झाली आहे. सुरुवातीस भव्य वाटणारा रस्ता आता केविलवाणा वाटत आहे.

गेल्या १२ वर्षांत अनेक मुख्याधिकारी आले आणि गेले. त्यांनी कोणती प्रशासकीय कार्यक्षमता दाखवली हा संशोधनाचा विषय आहे. यापुढे अतिक्रमणे होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी घ्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

इन्फो

१) व्यावसायिक वापर असलेल्या ८४० मालमत्ता

२) मिश्र रहिवासी व व्यावसायिक वापर असलेल्या ७४६ मालमत्ता

३) टपरी रजिस्टरमध्ये ७५ टपऱ्या नोंद आहेत.

फोटो - १३ नांदगाव

शाकांबरी व लेंडी नद्यांवरील पूल हळूहळू अतिक्रमणांच्या विळख्यात आवळला जात आहे.

130921\13nsk_7_13092021_13.jpg

फोटो - १३ नांदगाव 

Web Title: Swamps, dirt-garbage on the roads to Nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.