स्वप्निल लोणकरचा व्यवस्थेने बळी घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:11 AM2021-07-05T04:11:14+5:302021-07-05T04:11:14+5:30

नाशिक : स्पर्धा परीक्षेतील मुख्य परीक्षा उत्तीर्ण करूनही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यात स्वप्निल लोणकर (वय २४) या विद्यार्थ्याने आत्महत्या ...

Swapnil Lonakar was killed by the system | स्वप्निल लोणकरचा व्यवस्थेने बळी घेतला

स्वप्निल लोणकरचा व्यवस्थेने बळी घेतला

googlenewsNext

नाशिक : स्पर्धा परीक्षेतील मुख्य परीक्षा उत्तीर्ण करूनही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यात स्वप्निल लोणकर (वय २४) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वप्निलची आत्महत्या म्हणजे व्यवस्थेने घेतलेला बळी असल्याचा आरोप छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केला असून, हुतात्मा स्मारक येथे संघटनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रविवारी (दि. ४) शासनाविरोधात जोरदार निदर्शने केली.

प्रशासनात रिक्त पदे असूनही कमी जागांच्या जाहिराती आणि त्याही वेळेवर निघत नाहीत. त्या निघाल्यानंतर ठरलेल्या वेळी परीक्षा होत नाहीत आणि परीक्षा झाल्याच तरी वर्षानुवर्षे निकाल नाहीत. इतके सगळे दिव्य पार पाडून परीक्षा पास झाल्यानंतरही उमेदवारांना नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने परीक्षार्थींचे मोठे नुकसान होत असल्याचे मत छात्रभारतीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले. छात्रभारतीचे राज्याध्यक्ष राकेश पवार यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थी कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरकारचा निषेध केला. तसेच नोकर भरती झालीच पाहिजे अशा घोषणाही दिल्या.

040721\04nsk_21_04072021_13.jpg

सरकार विरोधात निदर्शने करताना छात्रभारतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी 

Web Title: Swapnil Lonakar was killed by the system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.