स्वरसागर विद्यालयातर्फे भक्तिसंगीताचा जागर
By admin | Published: October 20, 2016 12:21 AM2016-10-20T00:21:51+5:302016-10-20T00:24:47+5:30
स्वरसागर विद्यालयातर्फे भक्तिसंगीताचा जागर
येवला : येथील स्वरसागर संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नवरात्री ते पौर्णिमेपर्यंत १६ दिवस देवी विसर्जन या काळात विविध देवी मंदिरे आणि देवीस्थापनास्थळी भक्तिसंगीताचे कार्यक्र म सादर केले.
कोटमगावची जगदंबामाता, सप्तशृंगीमाता, हिंगलाजमाता, रेणुका देवी मंदिर यांसह गावातील १६ ठिकाणी संगीतमय भजने आणि गीते सादर केली. ‘अंबेचा जोगवा, चलो बुलावा आया है, उदे गं आंबे
उदे’ यांसह एकाहून एक सरस भक्तिगीते सुमधुर आवाजात आणि संगीताच्या साथीने सादर केल्याने भाविकांना गेले १५ दिवस मनमुराद आनंद घेता आला.
संगीत विशारद प्रा. सागर भावसार, हर्ष कोकणे (तबलावादक), गणेश लोहार (ढोलक), साई कडू (खंजिरी), गायनाचे साथी पीयूष म्हसके, विधी काबरा, गिरिजा कुलकर्णी, सोमेश्वर गायकवाड, प्रसाद भावसार, भक्ती कोकणे, कृष्णा लाघवे यांनी या उपक्र मात सहभाग घेतला. प्रत्येक देवी मंदिर ट्रस्टींनी भक्तिसंगीत कलाकारांचा यथोचित सत्कार केला. (वार्ताहर)
राष्ट्रवादी काँगे्रसची दिंडोरीत बैठक
दिंडोरी : तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक
गुरुवारी (दि. २०) दुपारी १२ वाजता दादासाहेब गायकवाड सभागृह, पंचायत समिती दिंडोरी येथे
महाराष्ट्र राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असून, या बैठकीला तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँगे्रसचे तालुका अध्यक्ष भास्कर भगरे यांनी केले
आहे. (वार्ताहर)