स्वराज्यसंवर्धन बहुउद्देशीय संस्थेची दुर्गसंवर्धन मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 06:22 PM2020-12-14T18:22:29+5:302020-12-14T18:23:09+5:30
जानोरी : जेवढा दुर्गम तेवढाच अवशेष संपन्न किल्ला म्हणजे सातमाळा पर्वत रांगेतील जिल्ह्यातील पुरातन वैभवच. अशा या दुर्गाचे जतन, संवर्धन होण्याची आवश्यकता आहे, म्हणून संस्थेने आपल्या बहुआयामी उपक्रमाबरोबरच किल्ल्यांची जोपासना व संवर्धनाचा संकल्प केला आहे.

वारंवार संवर्धनाच्या मोहिमा घेऊन किल्ला स्वच्छ व सुस्थितीत करण्याच्या हेतुने घेतलेल्या या मोहिमेत दगड, पालापाचोळा, गवत, वेली, काटेरी झुडपे, साबरे यात अदृश्य होत चाललेल्या किल्ल्यांवरील लेण्यांची स्वच्छता करून त्यांचा एक प्रकारे श्वास मोकळा केला. दिवसभर चाललेल्या या उपक्रमात संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व स्तरातील शिवप्रेमींनी सहभाग नोंदवला.
या स्वच्छता मोहिमेत प्रवीण भेरे, भाऊसाहेब कुमावत, अनुप गायकवाड, प्रा. सोमनाथ मुठाळ, दत्तू भेरे, भाऊसाहेब चव्हाणके, डॉ. कापडणीस, नितीन ठाकरे, प्रा. नितीन देशमुख, महादेव खिल्लारे, प्रवीण घोलप, रामदास बुरकुल, कचरु वैद्य, समाधान जाधव, विश्वास चव्हाण, रमेश सोमवंशु, अमोल घोलप, सचिन भामरे, डॉ. उमेश गावित, प्रवीण पवार, संदीप कांदे, सुनील जाधव, रवि विधाते, एकनाथ ठाकरे, रमेश काष्मिरे, गणेश घोलप, शरद चव्हाण, रुद्राक्ष चव्हाणके आदी सहभागी झाले होते.
(१४ जानोरी, १)