सावरगावी घरफोडीत दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 02:24 PM2019-09-09T14:24:32+5:302019-09-09T14:24:46+5:30
न्यायडोंगरी : सावरगांव येथील शेतात वास्तव्य करीत असलेले प्रगतशील शेतकरी अण्णा मोतीराम शेलार यांच्या घराचे रविवारी मध्य रात्रीस कुलूप तोडून घरातील कपाट फोडून तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास करु न चोरांनी पळ काढला.
न्यायडोंगरी : सावरगांव येथील शेतात वास्तव्य करीत असलेले प्रगतशील शेतकरी अण्णा मोतीराम शेलार यांच्या घराचे रविवारी मध्य रात्रीस कुलूप तोडून घरातील कपाट फोडून तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास करु न चोरांनी पळ काढला. घरातील सर्व कुटुंब झोपेत असतांना सदर घटना घडली सकाळी झोपेतून उठल्यानंतर झालेली घटना समजताच गावातील पोलीस पाटील सोमनाथ देवराम पाटील यांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर गावातील सोमनाथ जगन्नाथ शेलार यांची मोटरसायकल चोरु न नेण्याचा प्रयत्न केला .मोटारसायकलचे बल्ब नादुरूस्त असल्याने पुढे एक किलोमीटरपर्यंत नेऊन गावाजवळील नाल्यात फेकून दिली. तसेच गावातून अशोक सोनवणे यांची एमएच ४१ एडी २५५० हिरो होंडा स्प्लेंडर गाडी चोरी गेल्याचे समजले. याबाबत माहिती पोलीस पाटील यांनी दिली. सध्या पावसाने हुळकावणी दिल्याने दुष्काळाचे सावट असल्याने त्यात अशा चोरी, घरफोड्या या घटना परिसरात घडल्याने घबराट व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर घटनास्थळी नांदगाव पोलीस निरीक्षक अनिल भवारी , पंकज देवकते, दिलीप वाघ यांनी झालेल्या घटनेची पाहणी केली असून पुढील तपास वेगाने करु असे आश्वासन सावरगाव येथील रहिवासी यांना दिले.