येवल्यात स्वारीपचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 03:22 PM2020-02-18T15:22:35+5:302020-02-18T15:22:47+5:30

येवला:महिलांवर होणारे अत्याचार व त्यांना संरक्षण मिळावे यासाठी येथील तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन स्वारिपतर्फे करण्यात आले. पक्षाचे येवला तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे ा यांच्या नेतृत्वा खाली ा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

  Swarip's basics in coming | येवल्यात स्वारीपचा ठिय्या

येवल्यात स्वारीपचा ठिय्या

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रातील हिंगणघाट, नागपूर ,औरंगाबाद या पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील नाताळे व लासलगाव येथीलम हिलेला पेट्रोल ओतून जाळण्याचा केलेला प्रयत्न या घटनांचा यावेळी निषेध करण्यात आला.


यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक तालुका स्तरावर जलद गतीने न्यायालयाची स्थापना व्हावी, पोस्को कायद्यात असणारी शिक्षा अधिक कठोर करण्यात यावी, पीडित महिला कुटूंबाचे पुनर्वसन तात्काळ करण्यात यावे, पोलिसांनी महिलांच्या तक्र ारी दखल करून व योग्य चौकशी करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, प्रत्येक पोलीस स्टेशनला आॅनलाइन तक्र ार निवारण केंद्र सुरू करावे, गर्दीच्या व कॉलेजच्या ठिकाणी निर्भया पथक नेमण्यात यावे आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, विजय घोडेराव, शशिकांत जगताप, बाळू आहिरे, विनोद त्रिभवन, सागर गरु ड, संतोष गायकवाड, वसंत पवार, महीला आघाडीच्या आशा आहेर, ज्योती पगारे, वाल्हुबाई जगताप, कमळाबाई खैरणार, उषा पगारे, पार्बताबाई पगारे ,अलका घोडेराव यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.(18येवला स्वारीप)

 

Web Title:   Swarip's basics in coming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.