गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी स्वारिपचा सायकल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:14 AM2021-03-05T04:14:43+5:302021-03-05T04:14:43+5:30

प्रारंभी विंचूर चौफुली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विंचूर चौफुलीवरून स्वारिपचे तालुकाध्यक्ष ...

Swarip's cycle march to demand reduction of gas price hike | गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी स्वारिपचा सायकल मोर्चा

गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी स्वारिपचा सायकल मोर्चा

Next

प्रारंभी विंचूर चौफुली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विंचूर चौफुलीवरून स्वारिपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांचे नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा तहसील कचेरीवर आला. मोर्चेकऱ्यांच्यावतीने तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देण्यात आले.

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती तत्काळ कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

गॅसवरील बंद झालेले अनुदान त्वरित ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा करण्याची मागणीही सदर निवेदनात करण्यात आली आहे. शासनाने इंधन व गॅस दरवाढ कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मोर्चात विजय घोडेराव, महेंद्र खळे, विजय पगारे, गणेश जाधव, बाळासाहेब अहिरे, विनोद त्रिभुवन, समाधान गुंजाळ, सतीश खळे, देवीदास पगारे, चांगदेव अहिरे, संतोष गायकवाड, राहुल गुंजाळ, सचिन लभडे, वैभव मांजरे, नाना पिंपळे, अतुल धिवर, बाळासाहेब सोनवणे, रोहन रणधीर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

(०४ येवला १)

===Photopath===

040321\04nsk_23_04032021_13.jpg

===Caption===

०४ येवला १

Web Title: Swarip's cycle march to demand reduction of gas price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.