निकवेल, दहिंदुले शिवारात चंदनचोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:16 AM2021-09-27T04:16:49+5:302021-09-27T04:16:49+5:30

कंधाणे : बागलाण तालुक्यातील निकवेल, दहिंदुले शिवाराकडे चंदन चोरट्यांनी आपला मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे. या चंदन चोरांनी ...

A swarm of sandalwood thieves in Nikvel, Dahindule Shivara | निकवेल, दहिंदुले शिवारात चंदनचोरट्यांचा धुमाकूळ

निकवेल, दहिंदुले शिवारात चंदनचोरट्यांचा धुमाकूळ

Next

कंधाणे : बागलाण तालुक्यातील निकवेल, दहिंदुले शिवाराकडे चंदन चोरट्यांनी आपला मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे. या चंदन चोरांनी शनिवारी (दि. २६) मध्यरात्री निकवेल येथील गट नंबर २१ ब अनिल वाघ यांच्या शेतातील चंदनाचे झाड कापून नेल्याने तालुक्यातील शेतकऱ्यात कमालीचा संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, सदर चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

चार-पाच दिवसांपूर्वी दहिंदुले येथील हिरुबाई बहिरम व प्रमिला रमेश ठुमसे यांच्या शेतातून चंदनाचे झाड कापून नेले. यावेळी वन कमिटीचे अध्यक्ष विवेक सोनवणे यांनी वन विभागाचे वनरक्षक नवनाथ मोरे यांना कळविले. मोरे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.बागलाण तालुक्यातील निकवेल- डांगसौंदाणे रस्ता हा नियमित वर्दळीचा असल्याने दिवसा पाहणी करणारे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आपला डाव साधत आहेत. शनिवारी त्यांनी आसपासची चंदनाची झाडे तोडून नेली. बांधावरील चंदनाची झाडे कापून नेली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर चोरटे केवळ एक-दोनऐवजी त्यांची टोळीच असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वन विभागाने याकडे लक्ष घालून चंदन चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी विवेक सोनवणे, पोलीस पाटील विशाल वाघ, निकवेल येथील शेतकरी अनिल वाघ व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

इन्फो...

सध्या परिसरात चंदन वृक्षांची कत्तल केली जात आहे. अत्यंत वनौषधी असलेली ही झाडे तस्करांच्या नजरेस पडली असल्याने रात्रीचा फायदा घेत ही झाडे कापून नेली जात आहेत. तालुक्याला पोलीस निरीक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी नवीनच रूजू झाले असून, आपल्या आरोपी शोधाचे कसब वापरून या चंदन तस्करांच्या मुसक्या आवळतात की फक्त तपासाचे सोपस्कार पूर्ण करतात, याकडे या भागातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. (२६ कंधाणे)

260921\26nsk_32_26092021_13.jpg

निकवेल, दहिंदुले परिसरात चंदन वृक्ष केला लंपास.

Web Title: A swarm of sandalwood thieves in Nikvel, Dahindule Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.