अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:22 AM2018-04-25T00:22:44+5:302018-04-25T00:22:44+5:30
येथील बाजार समितीच्या सतरा जागांच्या निवडणुकीसाठी विक्र मी अर्जांची विक्र ी होऊन एक दिवस शिल्लक असल्याने अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची झ्ांुबड उडाली होती. मंगळवारी (२४) पाचव्या दिवशी ७१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सटाणा : येथील बाजार समितीच्या सतरा जागांच्या निवडणुकीसाठी विक्र मी अर्जांची विक्र ी होऊन एक दिवस शिल्लक असल्याने अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची झ्ांुबड उडाली होती. मंगळवारी (२४) पाचव्या दिवशी ७१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येथील बाजार समितीच्या सतरा जागांसाठी प्रथमच शेतकऱ्यांमधून निवडणूक होत आहे. येत्या २७ मे होणाºया निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २५ एप्रिल अंतिम मुदत आहे. सोमवार अखेर सतरा जागांसाठी २१ जणांनी अर्ज भरले. मंगळवारी पाचव्या दिवस अखेर ७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी ,बाजार समितीचे माजी सभापती अनिल चव्हाण , शिवसेनेचे शहर प्रमुख जयप्रकाश सोनवणे , समकोचे माजी अध्यक्ष श्रीधर कोठावदे , संचालक किशोर गहीवड या मातब्बरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. गण निहाय अर्ज दाखल केलेल्याची नावे असे डांगसौंदाने संजय सोनवणे , ब्राम्हणगाव सुभाष अहीरे , नरेंद्र उखा अहीरे ,किरण मधुकर अहीरे ,कैलास अहीरे ; सटाणा दक्षिण सोसायटीचे सभापती भिकाजी सोनवणे, सुभाष तुळशीराम सोनवणे , बाळकृष्ण भावराव देवरे ,तळवाडे दिगर , पंकज अशोक ठाकरे ,बाजीराव वामन अहीरे ; कंधाणे प्रा.अनिल पाटील , सुभाष सावकार, वसाकाचे माजी उपाध्यक्ष अमृत बिरारी ,संजय बिरारी ; मुंजवाड शैलेश सूर्यवंशी , प्रभाकर दादाजी रौंदळ ,प्रकाश निकम; ठेंगोडा आनंदा सोमनाथ भोये , लखमापूर अनिल पोपट
चव्हाण ,अजमिर सौंदाणे प्रकाश चिंतामण देवरे ,खामताणे स्वाती दिनेश गुंजाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.