‘जीएसटीमुळे स्वस्ताई’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 03:54 AM2017-09-15T03:54:47+5:302017-09-15T03:55:22+5:30
देशाने स्वीकारलेल्या जीएसटीप्रणालीमुळे चाळीस वस्तूंचे कर कमी झाल्यामुळे त्या स्वस्त झाल्या आहेत. आता दुहेरी करपद्धती संपुष्टात येणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत गॅस्केटिंग इफेक्ट संपल्याने अनेक वस्तूंचे दर ३५ ते ५५ टक्क्यांनी कमी होतील. त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत न पोहोचवणा-यांविरुद्ध नफेखोरी विरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे संकेत राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी दिले.
नाशिक : देशाने स्वीकारलेल्या जीएसटीप्रणालीमुळे चाळीस वस्तूंचे कर कमी झाल्यामुळे त्या स्वस्त झाल्या आहेत. आता दुहेरी करपद्धती संपुष्टात येणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत गॅस्केटिंग इफेक्ट संपल्याने अनेक वस्तूंचे दर ३५ ते ५५ टक्क्यांनी कमी होतील. त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत न पोहोचवणा-यांविरुद्ध नफेखोरी विरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे संकेत राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी दिले.
जीएसटी लागू झाल्यानंतर उद््भवलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स तसेच पुना मर्चंट््स चेंबरच्या वतीने नाशिक येथे राज्यस्तरीय व्यापारी परिषद संपन्न झाली. त्याच्या उद््घाटनाप्रसंगी केसरकर बोलत होते. कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, जीएसटी आयुक्त राजीव जलोटा, नाशिकमधील सह आयुक्त चित्रा कुलकर्णी तसेच महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, पुना मर्चंट चेंबर्सचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांच्यासह चेंबरचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
जीएसटीच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने केंद्र सरकारने तयार केलेल्या कौन्सिलमध्ये महाराष्टÑाचा वाटा आणि प्रभाव मोठा आहे.
राणे भाजपाला कसे चालतील? - दीपक केसरकर यांचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘करप्शनला झिरो टॉलरन्स ’अशी घोषणा केली होती. अशावेळी नारायण राणे यांच्यासारखा नेता भाजपाला कसा चालू शकेल, असा टोला अर्थराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी येथे लागवला. बेहिशेबी मालमत्ता जमावणाºयांची यादी लवकरच उच्च न्यायालयात सादर केली जाणार आहे. त्यात ज्यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे,