स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:22 AM2018-02-27T00:22:35+5:302018-02-27T00:22:35+5:30

शहरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Swatantryaveer Savarkar's honor for honor | स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली

googlenewsNext

नाशिक : शहरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात  आली. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  जुने नाशिक येथील पिंपळगाव येथील स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटनेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी किरणराजे भोसले व अ‍ॅड. शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील परदेशी, शंतनू परदेशी, अ‍ॅॅड. किरण कांबळे, माजी नगरसेवक बाळू कोकणे, नानासाहेब वाणी, बाबा खैरनार, किरण हिरवे आदी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. कांबळे यांनी सावरकरांविषयी माहिती दिली. याप्रसंगी पदाधिकारी, कार्यक्रर्ते व नागरिक उपस्थित होते.
अभिनव भारत मंदिर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त तीळभांडेश्वर लेन येथील अभिनव भारत मंदिर येथे अभिवादन कार्यक्रम पार पडला. सोमवारी (दि.२६) सकाळी झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी शाहू खैरे यांच्या हस्ते सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सावरकरांच्या कार्याला यावेळी उजाळा देण्यात आला. यावेळी याठिकाणी सावरकरांचे स्मारक का होत नाही याविषयी चर्चा करण्यात आली. सावरकर यांचे स्मारक कधी होणार? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. शासन दरबारी याचा नेटाने पाठपुरावा केला जाणार असल्याचे यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले. याप्रसंगी सूर्यकांत रहाळकर, वत्सला खैरे, चेतन काटे, शिरीष सोनवणे, सचिन निरंतर, श्रीकृष्ण नेऊरगावकर, रमेश झोले, विजय काळे, शुभम महाले, विश्वास घोटेकर, मनीष शहा, अविनाश शुक्ल, तेजस कदम, योधन रानडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेठे विद्यालय
येथील पेठे विद्यालयात स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सावरकरांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक एकनाथ कडाळे, कुंदा जोशी, शशांक मदाने आदी उपस्थित होते. प्राजक्ता शेलार यांनी स्वा. सावरकरांचे जीवनातील अनेक पैलू सांगितले. शिक्षक हर्षल कोठावदे यांनी सावरकरांची माहिती आपल्या भाषणातून सांगितली. सूत्रसंचालन नमस्कार शिंदे यांनी केले.
स्मारक उभारण्यासाठी परवानगी हवी
तीळभांडेश्वर लेन येथील अभिनव भारत मंदिर याठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य होते. त्यांचे स्मारक याठिकाणी व्हावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र शासनाकडून त्याला परवानगी मिळत नाही. त्यामुळे हा प्रश्न तसाच पडून आहे. याठिकाणी स्मारक करण्यासाठी शासनाची फक्त परवानगी हवी. अभिनव भारत मित्रमंडळातर्फे त्याची निर्मिती केली जाणार असून त्यासाठी निधीही उभा राहू शकतो. शासनाकडून पैशांची अपेक्षा नाही. केवळ परवानगी देणे अपेक्षित आहे, अशी माहिती शाहू खैरे यांनी दिली. सरकारवाड्यासारख्या वास्तूंचा जीर्णोद्धार होऊ शकतो, तर या स्मारकासाठी का परवानगी दिली जात नाही, असा सवाल करीत यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
बागेश्री वाद्यवृंदतर्फे गीतांची मैफल
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना त्यांनीच रचलेल्या वैविध्यपूर्ण गीतातून बागेश्रीच्या कलाकारांनी अभिवादन केले. भगूरच्या सावरकर स्मारकात सोमवारी (दि.२६) कार्यक्रम पार पडला. यावेळी बागेश्रीच्या कलाकारांनी ‘जयोस्तुते’ या गीताने मैफलीचा प्रारंभ केला. त्यानंतर राजेंद्र सराफ, शिवानी जाधव, सावनी कुलकर्णी, दीपक दीक्षित, मृण्मयी कापसे यांनी ‘अनादी मी अनंत मी’, ‘व्याप्र नक्र सर्प सिंह’, ‘डोळे भरून देव मला पाहू द्या’, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ यांसारखी विविध गाणी सादर केली. गायक शर्वरी मंगळवेढेकर यांनी ‘संगीत संन्यस्त खडग’ या नाटकातील ‘मर्म बंधातली ठेव ही’ व ‘शतजन्म शोधताना’ ही नाट्यपद सादर करीत रसिकांची दाद मिळवली. गाण्यांना चारुदत्त दीक्षित (संवादिनी), श्रीकांत मोजाड (तबला), दीपक दीक्षित व ऋषीकेश गायकवाड (तालवाद्ये) यांनी साथसंगत केली. श्रेया गायकवाड हिने सूत्रसंचालन केले. प्रारंभी डॉ. मृत्युंजय कापसे, रामदास आंबेकर, शिवानी जाधव, एकनाथ शेटे आदींनी सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी विलास कुलकर्णी, प्रताप गायकवाड, खंडेराव खैरनार, प्रफुल्ल चव्हाण, मनोज कुंवर उपस्थित होते.

Web Title: Swatantryaveer Savarkar's honor for honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक