ऐटदार गुलाब राजा, लाजरी गुलाब राणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:59 AM2019-02-23T00:59:28+5:302019-02-23T01:00:00+5:30

ऐटदार गुलाब राजा, लाजरी गुलाब राणी त्याचबरोबर गुलाब राजपुत्र व राजकन्या...सोबत अन्य फुले, तबक उद्यान, फुले, पुष्पगुच्छांची सजावट तसेच रांगोळ्या आणि सेल्फी पॉर्इंट अशा वातावरणात शुक्रवारी सायंकाळी महापालिकेत निसर्गप्रेमींची जत्राच भरली. पुलवामातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी उभारण्यात आलेला तीस फुटी फ्लॉवर टॉवर अर्थात पुष्पमनोरा हादेखील सर्वांचेच आकर्षण ठरला.

 Sweet rose king, lazy Rose Queen! | ऐटदार गुलाब राजा, लाजरी गुलाब राणी !

ऐटदार गुलाब राजा, लाजरी गुलाब राणी !

Next

नाशिक : ऐटदार गुलाब राजा, लाजरी गुलाब राणी त्याचबरोबर गुलाब राजपुत्र व राजकन्या...सोबत अन्य फुले, तबक उद्यान, फुले, पुष्पगुच्छांची सजावट तसेच रांगोळ्या आणि सेल्फी पॉर्इंट अशा वातावरणात शुक्रवारी सायंकाळी महापालिकेत निसर्गप्रेमींची जत्राच भरली. पुलवामातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी उभारण्यात आलेला तीस फुटी फ्लॉवर टॉवर अर्थात पुष्पमनोरा हादेखील सर्वांचेच आकर्षण ठरला.
दरम्यान, उद््घाटन सत्रातच गुलाब राजा आणि राणीसह विविध पुरस्कारांचे वितरण अभिनेत्री अनिता दाते, महापौर रंजना भानसी आणि आयुक्तराधाकृष्ण गमे यांच्या हस्ते पार पडले. गुलाब राजा पुरस्काराचे मानकरी सोनू रमेश काठे ठरले, तर गुलाब राणी पुरस्कार पुष्पक फ्लोरीने पटकावला. गुलाब राजकुमारीचा मान बाबुलाल नर्सरीने पटकावला, तर गुलाब राजकुमारचा मान सुकदेव महापात्रा यांनी पटकावला. फुलराणी हा मानाचा पुरस्कारदेखील बाबुलाल नर्सरीने पटकावला.
विविध स्पर्धांचे विजेते
कुंडीतील शोभा वनस्पती व सर्वोत्तम बोन्साय गटात पपया नर्सरी, सर्वाेत्तम पुष्परचना प्रतिभा जिंतूरकर, जपानी पुष्परचना स्मृती जिंतूरकर, पुष्परांगोळी ऐश्वर्या आव्हाड, सवोत्तम तबक उद्यान ज्योती पाटील, कुंडीतील शोभा वनस्पती प्रसाद नर्सरी याप्रमाणे विजेते घोषित करण्यात आले. मनपाच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित उद्यान प्रतिकृती स्पर्धेत पूर्व विभागाने बाजी मारली.

Web Title:  Sweet rose king, lazy Rose Queen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.