प्रशासनाच्या आदेशाने मिठाई दुकानदार संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:27 AM2021-03-13T04:27:03+5:302021-03-13T04:27:03+5:30

दैनंदिन सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी, शनिवार व रविवारी दुकाने पूर्ण ...

Sweet shopkeeper confused by administration order | प्रशासनाच्या आदेशाने मिठाई दुकानदार संभ्रमात

प्रशासनाच्या आदेशाने मिठाई दुकानदार संभ्रमात

Next

दैनंदिन सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी, शनिवार व रविवारी दुकाने पूर्ण वेळ बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने मिठाई दुकानदारांचे मोठे नुकसान होणार आहे. मिठाई पदार्थ जीवनावश्यक वस्तूत मोडत असल्याने ते सर्व दुग्धजन्य पदार्थापासून बनवलेले असतात सध्या उन्हाळा असल्याने मिठाई पदार्थ खराब होण्याची दाट शक्यता आहे शनिवार व रविवार दुकाने बंद राहिल्यास मिठाई तशीच पडून राहून ती नाशवंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुकानदारांना ज्या नियम, अटी पाळण्यास सांगितले आहे त्याचे पालन मिठाई दुकानदार करत आहेत. मात्र शनिवार व रविवार या दिवशी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली तर नुकसानीला सामोरे जावे लागणार नाही. तसेच दुकानात कोणत्या प्रकारची गर्दी होऊ न देता मिठाई पार्सल काऊंटर चालू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मिठाई युनियन नाशिक शहर संघटनेचे दीपकशेठ चौधरी, पुखराज चौधरी, मांगीलाल चौधरी गणपत चौधरी, हंसाराम चौधरी, मनोज कोतकर, अतुल देवरे, सखाराम चौधरी, धनाराम चौधरी, गमनाराम चौधरी, आदी मिठाई दुकानदारांनी केली आहे.

-------

प्रतिक्रिया====

पार्सल विक्रीला परवानगी द्यावी

राज्यात कोरोना संसर्ग लक्षात घेऊन शासनाने दररोज दुकानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशी दिली आहे. मिठाई जीवनावश्यक वस्तू असल्याने शनिवार व रविवार या दिवशी मिठाई दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी किंवा मिठाई दुकानदारांना मिठाई पार्सल विक्रीसाठी परवानगी दिल्यास दुकानदारांचे नुकसान होणार नाही.

- दीपकसेठ चौधरी, सागर स्वीट संचालक

Web Title: Sweet shopkeeper confused by administration order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.