‘गोड’ द्राक्ष भावाअभावी ‘आंबट’; एकरी २० हजारांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:32 AM2018-03-13T01:32:30+5:302018-03-13T01:32:30+5:30

कर्जाचा डोंगर, वाढलेली मजुरी, महागडी औषधे, कुटुंबाचे कष्ट आणि वर्षभर नैसर्गिक  आपत्तींचा सामना करीत पिकविलेल्या गोड द्राक्षांना भाव नसल्याने बागायतदारांना ती ‘आंबट’ लागत आहेत.

 'Sweet' 'Sour' due to grapple; A total of 20 thousand people hit | ‘गोड’ द्राक्ष भावाअभावी ‘आंबट’; एकरी २० हजारांचा फटका

‘गोड’ द्राक्ष भावाअभावी ‘आंबट’; एकरी २० हजारांचा फटका

googlenewsNext

योगेश सगर ।
कसबे सुकणे : कर्जाचा डोंगर, वाढलेली मजुरी, महागडी औषधे, कुटुंबाचे कष्ट आणि वर्षभर नैसर्गिक  आपत्तींचा सामना करीत पिकविलेल्या गोड द्राक्षांना भाव नसल्याने बागायतदारांना ती ‘आंबट’ लागत आहेत.  ‘ग्रीन बेल्ट’ अर्थात द्राक्षपंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक घटणाºया भावामुळे चिंंतातुर आहेत. ३५ ते ४० रुपये भाव, पावसामुळे घटलेले उत्पादन व झालेला खर्च पाहता त्यांना एकरी १५ ते २० हजार रुपये तोटा होत आहे. मजुरी, औषधे, खते, संप्रेरक, ट्रॅक्टर डीझेल, ठिंबक, स्प्रिंकलर, मेंटेनन्स आदींचा खर्च एकरी सव्वा ते दीड लाखांपर्यंत जातो. त्यातच आर्थिक वर्ष संपत आल्याने बँकांनी बागायदारांकडे कर्जवसुलीचा तगादा लावला आहे.
यंदा उत्पादन घटले- नाशिक जिल्ह्यात सुमारे अडीच ते पावणे तीन लाख एकरावर विविध जातीच्या द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात ३५ ते ४० लाख टन उत्पादन होते. यात नाशिक जिल्ह्याचा वाटा २५ ते ३० लाख टन आहे. यंदा निफाडसह नाशिक, दिंडोरीतील द्राक्षबागांचे अवेळी पावसाने ३५ ते ४०% नुकसान झाले. एकरी १४ ते १५ टन द्राक्षऐवजी ते ७ ते ८ टन उत्पादन झाले. निफाडच्या खेरवाडी, ओणे, सुकेणे, चांदोरी, नाशिकच्या गिरणारे, दुगाव, मखमलाबाद, दरी-मातोरी, जलालपूर व दिंडोरीच्या पश्चिम भागाचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. त्यामुळे निर्यातक्षम व लोकलच्या द्राक्ष उत्पादनात निम्म्याने घट झाली.
10%  वाइनरी सुरू
वाइन कॅपिटल असलेल्या नाशिक जिल्ह्यात ६० वायनरी आहेत. यातील केवळ सात ते आठ वायनरी सुरू आहेत. जेमतेम एक टक्का द्राक्षे वायनरीला जातात. सध्या दर्जानुसार वाइनरीच्या द्राक्षांना ६० रुपयांपर्यंंत भाव मिळत आहे.

Web Title:  'Sweet' 'Sour' due to grapple; A total of 20 thousand people hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी