पोषक वातावरणामुळे वाढला मधाचा गोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 05:36 PM2021-02-03T17:36:04+5:302021-02-03T17:37:01+5:30
चांदोरी : यंदा पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठे फुल्ल आहेत. शिवाय, थंडीचा कडाकाही वाढला असून, शेतशिवार पिकांनी बहरून गेले आहे. यामुळे मधनिर्मितीसाठीचा मकरंद सहज उपलब्ध होऊ लागल्याने या परिसरात मधमाश्यांची संख्या वाढली आहे. शिवाय, मधाची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणांना यामुळे अधिकचा मध उपलब्ध होत आहे.

मध हा चविष्ट व औषधी गुणधर्मयुक्त असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मधविक्रेते झाडांच्या फांद्याना लागलेला मधाचा गोळा विक्रीस आणतात. यामुळे ग्राहकांना १०० टक्के शुद्ध मध असल्याची खात्री पटते. निफाड तालुक्यात मध ३०० ते ५०० रुपये किलोपर्यंत विक्री केला जातो. मागील काही दिवसांत कमी पाणी तसेच वातावरणात होणारे बदल यामुळे मध विक्री करणाऱ्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला होता.
मात्र, सध्या सर्व पिके बहरले असल्याने मधमाश्यांना मकरंद सहज उपलब्ध होत आहे. यंदा पोषक वातावरणामुळे मधाचा गोडवा वाढला आहे. तसेच मध विक्री करणाऱ्या युवकांना सहज मध उपलब्ध होत आहे. शिवाय, मधमाश्यांमुळे होणाऱ्या परागीभवनामुळे शेती उत्पादनास वाढ होण्यास मदत होणार आहे.