भेटवस्तूंसोबत मिठाईचा गोडवा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:34 AM2018-10-28T00:34:24+5:302018-10-28T00:35:07+5:30

अवघ्या आठवडाभराच्या अंतरावर आलेल्या दीपोत्सवाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साह संचारू लागला असून, नवरात्रोत्सवानंतर लागलीच दिवाळीच्या खरेदीची लगबग बाजारपेठेत दिसू लागली आहे. दिवाळीसाठीच्या विविध वस्तूंनी बाजारपेठ बहरून निघालेली असताना पणत्या, आकाशकंदील, पूजा साहित्य, कपडे यासोबतच वेगवेगळ्या व आकर्षित पॅकिंगमधील मिठाई व ड्रायफ्रुटच्या बॉक्सेसने बाजारपेठ सजली आहे.

 The sweetness of the sweet will increase with the gifts | भेटवस्तूंसोबत मिठाईचा गोडवा वाढणार

भेटवस्तूंसोबत मिठाईचा गोडवा वाढणार

Next

नाशिक : अवघ्या आठवडाभराच्या अंतरावर आलेल्या दीपोत्सवाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साह संचारू लागला असून, नवरात्रोत्सवानंतर लागलीच दिवाळीच्या खरेदीची लगबग बाजारपेठेत दिसू लागली आहे. दिवाळीसाठीच्या विविध वस्तूंनी बाजारपेठ बहरून निघालेली असताना पणत्या, आकाशकंदील, पूजा साहित्य, कपडे यासोबतच वेगवेगळ्या व आकर्षित पॅकिंगमधील मिठाई व ड्रायफ्रुटच्या बॉक्सेसने बाजारपेठ सजली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सणात गोडवा भरण्यासाठी आप्तेष्टांना भेटवस्तू देण्याची प्रथा असून, या वस्तूसोबत मिठाईच्या व ड्रायफु्रट बॉक्स भेट देऊन आपल्या आप्तेष्टांची दिवाळी गोड करण्याचे बेत नााशिककरांडून आखले जात आहेत.  गेल्या काही वर्षांपासून दीपोत्सवात आप्तेष्टांना आणि नातेवाइकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासोबतच भेटवस्तू देण्याचा ट्रेंड रुळला असून, भेटवस्तूंसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईचे स्थान हे सर्वप्रथम आहे. त्यामुळे यंदाच्या दीपोत्सवात ड्रायफ्रुट्स आणि मिठाईच्या बॉक्सला सर्वाधिक मागणी असल्याने मिठाई विके्रत्यांनी मिठाईचे वेगवेगळे प्रकार तयार केले आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ मेनरोड, रविवार कारंजा, जुने नाशिक यासह कॉलेजरोड, गंगापूररोड, सातपूर, जेलरोड, सिडको, नाशिकरोड, उपनगर यांसह इतर भागात ड्रायफ्रुट व मिठाईची दुकाने थाटण्यात येत आहेत. नव्या व्हरायटीचे ड्रायफु्रट व मिठाई बॉक्स विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. दरवर्षी मिठाईसोबतच ड्रायफ्रुट्स बॉक्सला नागरिक पसंती देतात. यंदादेखील स्क्वेअर, राउंड, फिश स्टाइल ड्रायफ्रुट बॉक्स विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. ३०० रुपयांपासून ड्रायफ्रुट्स बॉक्स उपलब्ध आहेत.
विविध प्रकारचे बिस्किटांचे बॉक्स उपलब्ध
मिठाई आणि ड्रायफ्रुटच्या जोडीला चॉकलेट बिस्किट, ड्रायफ्रुट बिस्किट यांसह इतर प्रकारच्या बिस्किटांचे बॉक्स यंदाच्या दीपोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मिठाईच्या बॉक्सची किंमत दोनशे रुपयांपासून सुरू होत असून, बिस्किटांच्या बॉक्सची किंमत २५० रुपयांपासून अधिक आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर भेटवस्तूसह या बॉक्सेसला अधिक मागणी राहणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.

Web Title:  The sweetness of the sweet will increase with the gifts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.