स्विफ्ट कारला मालगाडीची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 11:02 PM2020-06-17T23:02:43+5:302020-06-18T00:35:05+5:30
नाशिकरोड : सौभाग्यनगर येथे सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार रेल्वे रु ळावर अडकली असता देवळाली कॅम्पकडून आलेल्या मालगाडीने कारला धडक देत रु ळाच्या बाहेर फेकले.
नाशिकरोड : सौभाग्यनगर येथे सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार रेल्वे रु ळावर अडकली असता देवळाली कॅम्पकडून आलेल्या मालगाडीने कारला धडक देत रु ळाच्या बाहेर फेकले. यात कारचा चक्काचूर झाला आहे. कारचा चालक व इतर इसम अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्विफ्ट डिझायरवरील (एमएच ३१/सीआर ५५५६) चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार सरळ पुढे जाऊन रेल्वे रु ळात अडकली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे चालक व गाडीत असलेल्या इतरांची भंबेरी उडाली. त्यांनी रु ळात अडकलेली गाडी सोडवण्याचा प्रयत्नदेखील केला. मात्र त्याचवेळी देवळाली कॅम्पकडून नाशिकरोडकडे मालगाडी येत होती. मालगाडीचा लाईट व हॉर्नचा आवाज ऐकून संबंधित चालक व इतर पळून गेले. मालगाडीने रेल्वेरुळात कारला जोरदार धडक दिल्याने ती रु ळाच्या बाहेर फेकली गेली. मालगाडीच्या धडकेने गाडी चक्काचूर झाली आहे.
मालगाडीचालकाने अपघाताची माहिती नाशिकरोड रेल्वेस्थानकाला कळवली. रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत, रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णू भोये त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे मालमत्तेचे नुकसान व रेल्वेच्या परिसरामध्ये अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सदर स्विफ्टची आरटीओ पासिंग नागपूरची असल्याचे पोलिसांनी सांगितले. गाडी मालक-चालक व त्यामधील लोकांचा रेल्वे सुरक्षा बल शोध घेत आहेत. युवती गाडी शिकत असताना ताबा सुटल्याने कार रेल्वे रु ळात जाऊन अडकल्याची चर्चा आहे.