खडकमाळेगाव बंधाऱ्यात पोहणाºयांची गर्दी लासलगाव : वाढत्या उकाड्यावर ‘स्विमिंग गु्रप’चा उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 11:58 PM2018-05-08T23:58:31+5:302018-05-08T23:58:31+5:30
लासलगाव : महाबळेश्वर नंतर निफाड तालुका राज्यातील थंड हवेचा तालुका म्हणून ओळखला जातो. हिवाळ्यात चार डिग्री सेल्सिअस तपमान, तर उन्हाळ्यात ४० अंश तपमान अशी येथील स्थिती आहे.
लासलगाव : महाबळेश्वर नंतर निफाड तालुका राज्यातील थंड हवेचा तालुका म्हणून ओळखला जातो. हिवाळ्यात चार डिग्री सेल्सिअस तपमान, तर उन्हाळ्यात ४० अंश तपमान अशी येथील स्थिती आहे. अंगाची लाही लाही करणारे कडाक्याचे ऊन त्यामुळे असह्य होणारा उकाडा यातून सुटका मिळावी यासाठी लासलगाव येथून थेड खडकमाळेगाव येथील बंधाºयात पोहायला जाणाºयांची संख्या वाढू लागली आहे. दोन व्यक्तींपासून सुरू झालेल्या स्विमिंग ग्रुपचा समूह १५० लोकांपर्यंत पोहोचला आहे. लासलगाव शहरात पोहण्यासाठी स्विमिंग पूल उपलब्ध नसून, पोहण्याचा व्यायाम करण्यासाठी शहरातील व परिसरातील डॉक्टर इंजिनिअर, शिक्षक, शेतकरी व व्यापारीवर्गाने एकत्र येऊन स्विमिंग ग्रुपची स्थापना केली आहे. लासलगावपासून पिंपळगाव बसवंत रस्त्याने दहा किलोमीटर अंतरावर गेले की खानगाव परिसरात खडकमाळेगाव बंधारा आहे. विद्यार्थ्यांना सध्या उन्हाळी सुट्ट्या असून, लहान मुलेही पोहण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे. बंधाºयामध्ये पोहणे तसे धोक्याचे असते; मात्र या स्विमिंग ग्रुपच्या वतीने येथे येणाºया प्रत्येक सदस्याची पुरेपूर काळजी घेतली जाते. योग्य त्या साहित्यांचा वापर केला जात आहे. परिसरात वाढती गर्दी लक्षात घेता येथे पोहण्यासाठी प्रशिक्षकांमार्फत मार्गदर्शनही केले जात आहे.