नाशिक शहरातही स्वाइन फ्ल्यूची लागण झा
By admin | Published: February 7, 2015 01:54 AM2015-02-07T01:54:39+5:302015-02-07T01:55:02+5:30
नाशिक शहरातही स्वाइन फ्ल्यूची लागण झा
नाशिक : राज्यात स्वाइन फ्ल्यूने डोके वर काढले असताना नाशिक शहरातही स्वाइन फ्ल्यूची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आल्याने महापालिका सतर्क झाली असून, महापौर अशोक मुर्तडक यांनी आरोग्य व वैद्यकीय विभागाला तातडीने दक्षता आणि उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील महापालिकांच्या रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्ल्यूसाठी विशेष कक्ष ठेवण्यात आले असून, खासगी रुग्णालयांनाही स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची माहिती कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात सुमारे दोनशेहून अधिक रुग्णांना स्वाइन फ्ल्यूची लागण होऊन २२ रुग्णांचा बळी गेल्याने घबराट निर्माण झाली आहे. नाशिक शहरातही स्वाइन फ्ल्यूचे दोन रुग्ण आढळून आल्याने महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाला सतर्क करण्यात आले आहे. शहरात सिडकोतील कामटवाडे येथील एक, तर सातपूरमधील एकाला स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्याचा अहवाल पालिकेला प्राप्त झाला आहे, तर येवला, निफाड आणि अहमदनगर येथील तीन रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. जानेवारीपासून महापालिकेच्या स्क्रिनिंग सेंटरमध्ये एकूण ३६ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले.