‘स्वाइन फ्लू’ने दिंडोरी तालुक्यातील इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:33 AM2018-09-23T01:33:01+5:302018-09-23T01:33:39+5:30
शहर तसेच जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रभाव वाढत चालला असून, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या दिंडोरी तालुक्यातील इसमाचा शनिवारी (दि़ २२) मृत्यू झाला़
नाशिक : शहर तसेच जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रभाव वाढत चालला असून, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या दिंडोरी तालुक्यातील इसमाचा शनिवारी (दि़ २२) मृत्यू झाला़ भाऊसाहेब मथुरे (५५, रा. आंबेगाव, ता. दिंडोरी) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ दरम्यान, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २९ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़ भाऊसाहेब मथुरे यांना दोन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात गंभीर स्थितीमध्ये हलविण्यात आले होते़ त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा स्वाइन फ्लूचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात १६ रुग्णं दाखल असून, त्यामध्ये आठ महिला व आठ पुरुष आहेत. यापैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित रुग्णांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. या रुग्णांपैकी ८ रुग्णं नाशिक शहरातील तर उर्वरित येवला-२, सिन्नर- २, इगतपुरी, नांदगाव, त्र्यंबेश्वर व देवळा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे़