महापालिका कर्मचाऱ्याचा स्वाइन फ्लूने मृत्यू?
By admin | Published: September 16, 2015 11:56 PM2015-09-16T23:56:32+5:302015-09-16T23:57:33+5:30
महापालिका कर्मचाऱ्याचा स्वाइन फ्लूने मृत्यू?
पंचवटी : शहरातही स्वाइन फ्लू जोमाने पसरत असल्याचे समोर आले असून मंगळवारी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे़ या कर्मचाऱ्यावर दिंडोरी रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते़ मयत कर्मचाऱ्याचे नाव मंगेश एकनाथ गवांदे असे असून ते मालवीय चौकातील दालवाला चेंबर्समधील रहिवासी आहेत़ दरम्यान त्यांचा अधिकृत तपासणी अहवाल प्राप्त झालेला नाही़
गवांदे हे नेहमीप्रमाणे बुधवारी सिडको परिसरात आपल्या कामास गेले होते़ दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडल्याने दिंडोरी रोडवरील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते़ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ दरम्यान हॉस्पिटलमधील तपासण्यांमध्ये स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली़ शहरात स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या वाढत चालली असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे़