स्वाइन फ्लूने वृद्ध महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:17 AM2017-11-05T00:17:35+5:302017-11-05T00:17:40+5:30
जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या ७५ वर्षीय वृद्धेचा शुक्रवारी (दि़ ३) पहाटे स्वाइन फ्लू व डेंग्यूमुळे मृत्यू झाला़ मथुरा दत्तात्रय नडगे (रा. सह्याद्री कॉलनी, कॅनॉलरोड, जेलरोड, नाशिकरोड) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे़ नडगे यांना गुरुवारी (दि़ २) सकाळी स्वाइन फ्लू कक्षात दाखल करण्यात आले होते़ आतापर्यंत शहर व जिल्ह्यातील ८४ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या ७५ वर्षीय वृद्धेचा शुक्रवारी (दि़ ३) पहाटे स्वाइन फ्लू व डेंग्यूमुळे मृत्यू झाला़ मथुरा दत्तात्रय नडगे (रा. सह्याद्री कॉलनी, कॅनॉलरोड, जेलरोड, नाशिकरोड) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे़ नडगे यांना गुरुवारी (दि़ २) सकाळी स्वाइन फ्लू कक्षात दाखल करण्यात आले होते़ आतापर्यंत शहर व जिल्ह्यातील ८४ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़ मथुरा नडगे यांच्या कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांना स्वाइन फ्लू व डेंग्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे़ स्वाइन फ्लू कक्षात उपचार सुरू असलेल्या नडगे यांची शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास प्रकृती खालावली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला़ सद्यस्थितीत दिवसा ऊन व रात्री थंडी असल्याने सर्दी, खोकला या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे़ त्यामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांनी केले आहे़
पाच रुग्णांवर उपचार
जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात सद्यस्थितीत पाच रुग्ण उपचार घेत असून, एकाचा अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित चौघांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. उपचार घेत असलेल्यांमध्ये एक पुरुष व चार महिला आहेत.