पुतळेवाडीत स्वाईनफ्लूने रूग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 05:37 PM2018-08-26T17:37:34+5:302018-08-26T17:39:07+5:30
सिन्नर : तालुक्यातील रामपूर (पुतळेवाडी) येथील राजेंद्र रतन पवार (४०) यांचा स्वाईन फ्लु आजाराने मृत्यु झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सिन्नर : तालुक्यातील रामपूर (पुतळेवाडी) येथील राजेंद्र रतन पवार (४०) यांचा स्वाईन फ्लु आजाराने मृत्यु झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पवार हे गत पाच-सहा दिवसांपासून आजारी होते. स्थानिक डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बुधवारी (दि.२२) रोजी कोपरगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असून पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यास सांगितले. डॉक्टरांनी त्यांना स्वाइन फ्लू झाल्याच्या संशयावरून त्यांच्या तोंडातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या शासकीय प्रयोगशाळेत धाडण्यात आले. तसेच त्यादृष्टीने पुढील उपचार देखील सुरू केले होते. दरम्यान शक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास मिळालेल्या वैद्यकीय अहवालावरून त्यांना स्वाईन फ्लु झाल्याचे उघड झाले. मात्र त्याच रात्री पहाटे उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, तीन बहीणी असा परिवार आहे.
दरम्यान (दि.२५) देवपूर व वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पवार कुटूंबीयांची भेट घेवून माहिती घेतली.