स्वाइन फ्लू संशयित रुग्ण सामान्य कक्षात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:55 AM2018-09-14T01:55:19+5:302018-09-14T01:55:28+5:30
महापालिकेच्या जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय नेहमी विविध कारणांसाठी चर्चेत असते. गुरुवारी (दि.१३) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून स्वाइन फ्लूसदृश रुग्णांना जागेअभावी झाकीर हुसेन रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले; मात्र येथील रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना ‘स्वाइन फ्लू आयसोलेशन कक्षात’ दाखल करण्याऐवजी थेट सामान्य पुरुष कक्षात दाखल केल्याने उपचार घेत असलेल्या अन्य रुग्णांसह नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
नाशिक : महापालिकेच्या जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय नेहमी विविध कारणांसाठी चर्चेत असते. गुरुवारी (दि.१३) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून स्वाइन फ्लूसदृश रुग्णांना जागेअभावी झाकीर हुसेन रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले; मात्र येथील रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना ‘स्वाइन फ्लू आयसोलेशन कक्षात’ दाखल करण्याऐवजी थेट सामान्य पुरुष कक्षात दाखल केल्याने उपचार घेत असलेल्या अन्य रुग्णांसह नातेवाइकांनी गोंधळ घातल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
जुन्या नाशकातील कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचा वैद्यकीय कारभार सुरळीत चालण्यास अद्याप मुहूर्त मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या रुग्णालयाची सूत्रे नेमकी कोणाला सोपवावी? हाच आता महापालिकेच्या आरोग्य विभागापुढे मोठा प्रश्न आहे. मनुष्यबळासह औषधांचा तुटवडा, वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाºयांचा हलगर्जीपणा अशा विविध कारणांमुळे मनपाच्या आरोग्यविभागाला जनसामान्यांसह लोकप्रतिनिधींच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी हे रुग्णालय प्रसूतीदरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे चर्चेत राहिले होते. गुरुवारी जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात जागा नसल्याने येवला व अन्य दुसºया शहरांमधून आलेल्या पुरुष, महिला
रुग्णाला संध्याकाळच्या सुमारास झाकीर हुसेन रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.
यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना स्वाइन फ्लू कक्षात दाखल करून न घेता सामान्य क क्षात दाखल करत उपचाराला सुरुवात केली. हा प्रकार अन्य रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर येथील परिचारिकांना व डॉक्टरांना नागरिकांनी धारेवर धरले. स्वाइन फ्लू संशयित रुग्णाला सामान्य कक्षातून अन्यत्र हलविण्याची मागणी करत प्रशासनाच्या गलथान कारभाराचा नागरिकांनी निषेध नोंदवत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
डॉक्टरांनी संतप्त अन्य रुग्णांच्या नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत हे रुग्ण स्वाइन फ्लू संशयित नसल्याचा दावा केला; मात्र काही वेळेनंतर स्वाइन फ्लू संशयित पुरुष रुग्णाला तत्काळ स्वाइन फ्लू कक्षात येथील हलविले.
रुग्णांनी धरला घराचा रस्ता
पुरुष, महिला सामान्य कक्षात उपचार घेणाºया रुग्णांपैकी सुमारे पंधरा ते वीस रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांनी घराचा रस्ता धरणे पसंत केले. परिचारिकांनी संबंधित रुग्णांना डिस्चार्ज घेऊन घरी निघून जाण्याचा सल्ला दिल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला. ज्या रुग्णांना स्वाइन फ्लू रुग्णाची भीती वाटत असेल त्यांनी डिस्चार्ज घेऊन घरी जावे, असे सांगण्यात आले.