येवला येथे स्वाइन फ्लूचा बळी

By admin | Published: September 13, 2014 11:59 PM2014-09-13T23:59:46+5:302014-09-14T00:06:44+5:30

येवला येथे स्वाइन फ्लूचा बळी

Swine Flu victim at Yeola | येवला येथे स्वाइन फ्लूचा बळी

येवला येथे स्वाइन फ्लूचा बळी

Next


नाशिक : गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवावर स्वाइन फ्लूचे सावट निर्माण झाले आहे. येवला तालुक्यातील धनकवळी येथील बाजीराव चव्हाण (४५) यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे, तर शहरातील खोडे मळा परिसरात स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सव व नवरात्रोत्सव काळात नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. यंदाही याच काळात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळल्याने नागरिकांनी अधिक सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. येवला तालुक्यातील धनकवळी येथील बाजीराव चव्हाण यांना ८ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांची आरोग्यस्थिती अतिशय खालावलेली असल्याने त्यांना लगेचच व्हेन्टीलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यात स्वाइन फ्लू या आजाराची लक्षणे दिसत असल्याने त्यांच्या लाळेचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले असता, नमुने पॉझिटीव्ह आढळले. अखेर आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान त्यांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी शहरातील खोडे मळा येथील स्वाइन फ्लूचा रुग्ण सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला होता.





मात्र वेळीच योग्य उपचार केल्याने या रुग्णाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. आतापर्यंत जिल्ह्णात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळल्याने नागरिकांनी अधिक सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. स्वाइन फ्लू या आजाराबाबतची काही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Swine Flu victim at Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.