मालेगावी तरुणाकडून तलवार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:13 AM2021-08-01T04:13:47+5:302021-08-01T04:13:47+5:30
------------------------ पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिने लंपास मालेगाव : भांडे व दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने अज्ञात दोघा जणांनी ...
------------------------
पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिने लंपास
मालेगाव : भांडे व दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने अज्ञात दोघा जणांनी सात हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुलोचना रमेशचंद्र अग्रवाल या वृद्धेने फिर्याद दिली आहे. शहरातील कॅम्प भागातील मारवाडी गल्लीत हा प्रकार घडला. याप्रकरणी पुढील तपास हवालदार पाटील करीत आहेत.
------------------
महिलेचा विनयभंग, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मालेगाव : शहरातील मुस्लिम पुरा भागात राहणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. मोहम्मद तहा, हमीद, इस्माईल ( पूर्ण नाव माहीत नाही) यांनी किरकोळ कारणावरून घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार एस एस गरुड करीत आहेत.
-------------------
तरुणाला मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : किरकोळ कुरापत काढून तरुणाला लाकडी दांडक्याने गंभीर स्वरूपाची मारहाण केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामसेतू परिसरात हा हाणामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी रवी निंबा सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. किरकोळ कुरापत काढून धीरज शेलार हिरामण शेलार, हर्षद ऊर्फ बंटी हिरामण शेलार, निलेश जगन्नाथ नवले या तिघांनी शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.
---------------------
दुचाकींची समोरासमोर धडक; एक जण ठार
मालेगाव : शहरातील सटाणा नाका भागात दाभाडी - मालेगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी वीरकुमार बाळासाहेब शेवाळे यांनी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सटाणा नाका भागात अज्ञात दुचाकी क्रमांक एम एच ४१ ए डब्लू२० ५७ वरील अज्ञात चालकाने दुचाकी क्रमांक एम एच ४२ ए एल ९४ ०१ हिला समोरून धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार पाठीमागे बसलेले विजय सुखदेव शेवाळे (५४) रा टेहरे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला तर दुचाकी चालवणारे रामेश्वर सावळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.