मालेगावी तिघांकडून तलवारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 22:47 IST2022-01-03T22:47:37+5:302022-01-03T22:47:37+5:30
मालेगाव : शहरातील मोतीबाग नाक्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून दुचाकीवर जाणाऱ्या तिघांना पकडले असून त्यांच्याकडून तलवारी जप्त करण्यात आल्या.

मालेगावी तिघांकडून तलवारी जप्त
मालेगाव : शहरातील मोतीबाग नाक्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून दुचाकीवर जाणाऱ्या तिघांना पकडले असून त्यांच्याकडून तलवारी जप्त करण्यात आल्या.
छावणी पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला असता (एम एच ४१ झेड २६००) या दुचाकीवर येणाऱ्या तिघांना सहायक पोलीस निरीक्षक सागर शिंपी, पोलीस नाईक देवा गोविंद, नरेंद्र कोळी, योगेश कोळी यांनी पकडले. त्यांच्याकडे गोणीत तीन तलवारी मिळाल्या. छावणी पोलिसात संशयित आरोपी मोहमद एकलाक अब्दुल, तौकिर अहमद मोहमद मुस्तफा आणि एक सोळा वर्षीय मुलगा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.