अभिनवच्या चिमुकल्यांनी नायलॉन मांजा न वापरण्याची घातली शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 05:51 PM2019-01-13T17:51:04+5:302019-01-13T17:51:26+5:30
सिन्नर: मविप्र संचलित आदर्श शिशु विहार व अभिनव बालविकास मंदिर या ज्ञान संकुलात नायलॉन मांजा न वापरण्याचे शपथ चिमुकल्यांना देण्यात आली.
सिन्नर: मविप्र संचलित आदर्श शिशु विहार व अभिनव बालविकास मंदिर या ज्ञान संकुलात नायलॉन मांजा न वापरण्याचे शपथ चिमुकल्यांना देण्यात आली. यावेळी सुमारे आठशे विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.
संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, संस्थेचे संचालक हेमंत वाजे, किरण भावसार, माजी संचालक कृष्णाजी भगत, संस्थेचे शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापक संगीता आव्हाड यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्याविषयी प्रबोधन करत शपथ दिली. पतंग उडविताना नायलॉन मांजा वापरणार नाही. आणि इतर कुणी वापरत असेल तर त्यास त्यापासून परावृत्त करून पर्यावरणाचे, पशुपक्षांचे आणि मानवाचे रक्षण करण्याचे काम आम्ही सचोटीने करू अशी शपथ चिमुकल्यांनी घेतली. मकर संक्रांतीच्या आनंद पतंग उडवून साजरा करताना नायलॉन मांजामुळे इजा होऊन पशु पक्षांसोबत मानवालाही त्यापासून इजा होण्याचा धोका अधिक असतो. अशा घटना गतवर्षी तसेच यावर्षी घडलेल्या आहे. त्यामुळे नायलॉन मांजा वापरू नये अशी शपथ सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली.