शहरात प्रतीकात्मक फाशी आंदोलन
By admin | Published: July 21, 2016 01:27 AM2016-07-21T01:27:18+5:302016-07-21T01:34:49+5:30
कोपर्डी घटनेतील निषेध : छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड आक्रमक
नाशिक : देशासह राज्यात महिलांच्या अत्याचारात सातत्याने होणारी वाढ, निर्र्भया हत्त्याकांड घडूनही सरकारने न घेतलेला धडा आणि यातून पुन्हा घडलेल्या कोपर्डीसारख्या घटनेचा निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडतर्फे बलात्कारी नराधमांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला बुधवारी (दि. २०) चौक मंडई येथे फाशी देण्यात आली. यावेळी देशाच्या कायदा व्यवस्थेकडेही लक्ष वेधण्यात आले. अशा घटना वारंवार घडू नये यासाठी कठोर कायद्यांची निर्मिती आणि अंमलबजावणी करण्याचीही मागणी या आंदोलनात सहभागी सदस्यांनी केली. यावेळी छत्रपती संस्थेचे अध्यक्ष अजिज पठाण, रफीक साबीर, मुक्तार शेख, तृणाल अंबोरे, आफताब सय्यद, सलीम पटेल, गौरव दाणी, इब्राहिम अत्तार, बशीर शेख, इमरान तांबोळी, मुखतार सय्यद, हरीश पाटकरी, मुजाहीद फारूकी, रमजान पठाण, बिस्मिला बाजी, शेहजादी शेख आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)