बांधावर खत पोहोचविण्यात यंत्रणा असमर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 09:38 PM2020-07-22T21:38:58+5:302020-07-23T00:58:41+5:30

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव, घोटी खुर्द परिसरात खताची तीव्र टंचाई जाणवत आहे. बांधावर तर दूरच; परंतु दुकानातदेखील युरियाची उपलब्धता करण्यात यंत्रणा असमर्थ ठरली. परिणामी ऐन हंगामात खतासाठी भटकंतीची वेळ आल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे.

The system is unable to deliver manure to the dam | बांधावर खत पोहोचविण्यात यंत्रणा असमर्थ

बांधावर खत पोहोचविण्यात यंत्रणा असमर्थ

Next

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव, घोटी खुर्द परिसरात खताची तीव्र टंचाई जाणवत आहे. बांधावर तर दूरच; परंतु दुकानातदेखील युरियाची उपलब्धता करण्यात यंत्रणा असमर्थ ठरली. परिणामी ऐन हंगामात खतासाठी भटकंतीची वेळ आल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रात सोय होणार नाही यासाठी थेट बांधावर निविष्ठा पोहोचविण्याची संकल्पना कृषिमंत्री दादा भुसे यांनी मांडली होती. सुरुवातीला या संकल्पनेला चांगले पाठबळ मिळाले.
त्यानंतर मात्र अनेक भागात निविष्ठा टंचाईची समस्या भेडसावू लागली. युरिया, डीएपी खतांची मात्र तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. रेल्वेच्या रेक पॉइंटमुळे ही समस्या उद्भवल्याचे सांगत कृषी विभाग, दुकानदार यांच्यामार्फत असे सांगण्यात येत आहे.
आता पिकाच्या वाढीसाठी खताची गरज असताना तेच मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. खताची टंचाई भासवित बोगस खते शेतकºयांकडे खपविली जात आहेत. परिणामी आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांची कोंडी झाली आहे. खतपुरवठा विस्कळीत लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था प्रभावित झाल्याने खताचा पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळेदेखील परिसरात खतटंचाई गडद झाल्याचे सांगितले जाते. परंतु याचा खरीप हंगामावर परिणाम झाला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात खरीपमधील भात पिकाची लागवड सुरू आहे. तण नियंत्रणाचे कामही अनेक शेतकºयांनी केले.
------------------
बांधावर तर दूरच; परंतु दुकानात गेल्यावरही खत मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. हंगामात कृषी सहाय्यकांनी मार्गदर्शनासाठी शेतावर जाण्याची गरज असताना तेसुद्धा फिरकत नाही. शासनाने इतर जबाबदाºया सोपविल्याचे ते सांगतात. अशा स्थितीत शेतकºयांनी काय करावे व कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न आहे.
- संतोष निसरड, शेतकरी, कवडदरा

Web Title: The system is unable to deliver manure to the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक