‘पोलीसमित्र’ यांनी जाळले टी-शर्टस

By admin | Published: June 4, 2017 01:53 AM2017-06-04T01:53:14+5:302017-06-04T01:53:23+5:30

निफाड : तालुक्यातील नैताळे येथे शेतकरी आंदोलकांनी नाशिक औरंगाबादरोडवर टायर जाळून आणि बटाटे फेकून तिसऱ्याही दिवशी संपास पाठिंबा देऊन सरकारचा निषेध व्यक्त केला

T-shirts burnt by 'Polysmith' | ‘पोलीसमित्र’ यांनी जाळले टी-शर्टस

‘पोलीसमित्र’ यांनी जाळले टी-शर्टस

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
निफाड : तालुक्यातील नैताळे येथे शेतकरी आंदोलकांनी नाशिक औरंगाबादरोडवर टायर जाळून आणि बटाटे फेकून तिसऱ्याही दिवशी संपास पाठिंबा देऊन सरकारचा निषेध व्यक्त केला, तर दुसऱ्या घटनेत नैताळे येथे पोलीसमित्र तरुणांनी पोलीसमित्र टी- शर्टस जाळून गुरुवारी नैताळे येथे झालेल्या पोलीस लाठीमाराचा निषेध केला.
शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नैताळे येथे रस्त्यावर बटाटे फेकून दिले. त्यानंतर टायर जाळून निषेध व्यक्त केला. या ठिकाणी निफाड पोलीस तातडीने दाखल झाल्यानंतर आंदोलक पसार झाले. दुसऱ्या घटनेत
गुरुवारी, दि १ मे रोजी पोलिसांनी नैताळे येथील आंदोलकांवर जो लाठीमार केला त्याचा निषेध म्हणून दि. ३ मे रोजी नैताळ्याच्या पोलीसमित्रांनी पोलीसमित्र असलेले टी-शर्टस एकत्रित जाळले. निफाड पोलिसांनी नैताळे येथे भरणाऱ्या श्री मतोबा महाराज यात्रेत येथील जवळजवळ १०० च्या आसपास तरु णांची पोलीसमित्र म्हणून पाच वर्षांपूर्वी नेमणूक केली होती हे सर्व पोलीसमित्र या मतोबा यात्रेत प्रचंड गर्दीत सुरक्षेसाठी पोलिसांना मदत करीत असे त्यामुळे पोलिसांचे या यात्रेत सुरक्षेबाबत काम सुकर होण्यास सहकार्य मिळत असे जवळजवळ पाच वर्षांपासून या सर्व पोलीसमित्रांनी श्री मतोबा महाराज यात्रेत पोलिसांना सुरक्षेसाठी सहकार्य केले होते. परंतु १ मे रोजी निफाड पोलिसांनी नैताळे येथे शेतकरी संपात सहभागी असलेल्या शेतकरी आंदोलकांना पांगवण्यासाठी जो लाठीमार केला त्यामुळे या पोलीसमित्र तरु णांमध्ये दु:खी वातावरण तयार झाले. लाठीमाराच्या निषेधार्थ टी-शर्टस जाळताना नैताळे येथील तरु ण.शेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी दि १ मे रोजी नैताळे येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी लाठीमार केला होता, तर त्यास प्रतिकार म्हणून आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. यामुळे नैताळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
शुक्र वारी, दि २ रोजी या लाठीमाराचा निषेध म्हणून नैताळे गाव बंद ठेवण्यात आले होते, तर ३ मे रोजी सुद्धा नैताळे गाव बंद ठेवण्यात आले अशाप्रकारे नैताळे गाव सलग तीन दिवस बंद असल्याने येथील सर्व व्यवहार ठप्प झाले.

Web Title: T-shirts burnt by 'Polysmith'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.