तबला, पखवाजाच्या तालात रसिक तल्लीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:16 AM2018-12-17T00:16:00+5:302018-12-17T00:24:10+5:30
ताल तीनतालातील परंपरेनुसार सावनी तळवलकर यांच्या एकल तबलावादनातील पेशकार, रेले, चलन, रव, तकुडे अणि चक्रदार यांच्यासह उत्तरार्धात ‘गुरु घर का साज जोडी’ पखवाज वाद्यावर ग्यानसिंग नामधारी यांच्या धमार तालातील पारंपरिक घराण्यातील पखवाजाचा बाज असलेले ठाह के बोल चलन, लयकारी, रेला यासह तीनतालात पारंपरिक बंदिशीच्या तालात रसिक तल्लीन झाले.
नाशिक : ताल तीनतालातील परंपरेनुसार सावनी तळवलकर यांच्या एकल तबलावादनातील पेशकार, रेले, चलन, रव, तकुडे अणि चक्रदार यांच्यासह उत्तरार्धात ‘गुरु घर का साज जोडी’ पखवाज वाद्यावर ग्यानसिंग नामधारी यांच्या धमार तालातील पारंपरिक घराण्यातील पखवाजाचा बाज असलेले ठाह के बोल चलन, लयकारी, रेला यासह तीनतालात पारंपरिक बंदिशीच्या तालात रसिक तल्लीन झाले.
प.सा. नाट्यगृहात रविवारी (दि.१६) भानुदास पवार स्मृती संगीत समारोह २०१८च्या प्रारंभी दीपप्रज्वलन झाल्यानंतर पूर्वार्धात सावनी तळवलकर यांचे एकल तबलावादन व उत्तरार्धात ग्यानसिंग नामधारी यांचे पखवाज वादन रंगले. सावनी तळवलकर यांनी तबलावादनातील ताल तीनतालातील परंपरेनुसार पेशकार, रेले, चलन, रव, तकुडे अणि चक्रदार चे सादरीकरण केले. त्यांना पुष्कराज भागवत यांनी संवादिनीसह साथसंगत केली. तर उत्तरार्धात ग्यानसिंग नामधारी यानी ‘गुरु घर का साज जोडी’ पखवाज वाद्यावर धमार तालातील पारंपरिक घराण्यातील पखवाजाचा बाज असलेले ठाह के बोल चलन, लयकारी, रेला यासह तीनतालात पारंपरिक बंदिशींचे सादरीकरण रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना प्रशांत महाबळ यांनी साथसंगत केली. प्रास्ताविक अविराज तायडे यांनी केले, तर सूत्रसंचालन सुनेत्रा महाजन यांनी केले.