विभागीय आयुक्तांकडून अधिकाºयांना तंबीकर्तव्याचे धडे : कामकाज सुधारण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 07:49 PM2017-09-14T19:49:03+5:302017-09-14T19:49:09+5:30

Tactical Lessons to Officers from the Divisional Commissioner: Advice to improve the work | विभागीय आयुक्तांकडून अधिकाºयांना तंबीकर्तव्याचे धडे : कामकाज सुधारण्याचा सल्ला

विभागीय आयुक्तांकडून अधिकाºयांना तंबीकर्तव्याचे धडे : कामकाज सुधारण्याचा सल्ला

Next


नाशिक : महसूल खात्यातील प्रांत व तहसीलदारांकडून कर्तव्यात होत असलेली कुचराई, जनतेला केली जात असलेली दुरुत्तरे व अधिकाराचा दुरुपयोगाच्या विषयावरून गुरुवारी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी विभागातील अधिकाºयांचा खºया अर्थाने ‘तास’ घेऊन त्यांना जाणीव करून दिली. यावेळी अधिकाºयांनी केलेल्या चुकांचा पाढाच वाचून अधिकाºयांना झणझणीत अंजन घालतानाच कामकाज सुधारा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबीही दिली.
सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत एकट्या विभागीय आयुक्तांनी उपस्थिताना नुसते मार्गदर्शनच केले नाही तर शासकीय कामकाम करताना काही मार्गदर्शक तत्त्वेही घालून दिली. प्रामुख्याने शासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी अधिकाºयांनी स्वत:ला झोकून दिले पाहिजे मात्र, अद्यापही अधिकाºयांमध्ये पंधराव्या व सोळाव्या शतकानुसार कामकाज केले जात असल्याचे झगडे म्हणाले. अधिकाºयांची ही मानसिकता संवेदनशून्य असून, वरिष्ठ कार्यालयाला माहिती पाठविताना केले जाणारे दुर्लक्ष, चुकीची माहिती देणे, स्मरण पत्रे पाठवूनही प्रतिसाद न देणे या साºया बाबी कामचुकारपणाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाºयांचा उपविभागीय अधिकाºयांवर, उपविभागीय अधिकाºयांचा तहसीलदारांवर व तहसीलदारांचा तलाठी, मंडळ अधिकाºयांवर कोणताही धाक व नियंत्रण नसल्याचे सांगून, झगडे यांनी गावपातळीवरील तक्रारींचे निराकरण तेथेच केले तर जनतेला तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी यावेच लागणार नाही, परंतु अधिकारी व कर्मचाºयांची मानसिकता जनतेचे काम सुकर करण्यासाठी नसून त्यांना त्रास देणारीच असल्याचे नमूद केले.
आयुक्त झगडे यांनी यावेळी महसूल खात्यातील प्रत्येक शाखेचे कामकाज कशा पद्धतीने चुकीचे चालते याची काही कागदपत्रेच बैठकीत सादर केली. त्यात प्रामुख्याने महसूल शाखा, पुरवठा शाखा, पुनवर्सन शाखा, निवडणूक शाखा अशा सर्वच शाखांची उदाहरणे देऊन अधिकाºयांना झणझणीत अंजन घातले व दाखविलेल्या चुका या उदाहरणादाखल असून, त्यापेक्षाही भयंकर गंभीर चुकांचे पुरावे आपल्या ताब्यात आहेत, परंतु ते येथे सादरीकरण करणे योग्य ठरणार नाही असे सांगून, ज्याने त्याने ते समजून घ्यावे, असा गर्भित सल्लाही दिला. विभागातील जिल्हाधिकाºयांनाही त्यांनी सोडले नाही. खालचे अधिकारी काय अहवाल पाठवतात याची खातरजमा न करताच माहितीचे सादरीकरण करणे सोडा, प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन कामकाजाची पाहणी करा व आपल्या अधिकारात नसलेली कामे करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी झगडे यांनी उपस्थिताना मध्येच अधूनमधून प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाची परीक्षाही घेतली.

Web Title: Tactical Lessons to Officers from the Divisional Commissioner: Advice to improve the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.