अखेरच्या महासभेवर तहकुबीची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 01:30 AM2019-11-19T01:30:02+5:302019-11-19T01:30:22+5:30

अखेरची महासभा..! महापौरांच्याच नव्हे तर सर्वच नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात राहते, ती सभेतील गोडवा नव्हे तर अखेरच्या सभेत बºया-वाईट प्रस्तावांच्या असणाºया भरण्यामुळे. कोणतेही सोयीचे आणि गैरसोयीचे प्रस्ताव महापौरांच्या अखेरच्या महासभेत होतात.

 Tahkubi's disappointment at the last General Assembly | अखेरच्या महासभेवर तहकुबीची नामुष्की

अखेरच्या महासभेवर तहकुबीची नामुष्की

Next

नाशिक : अखेरची महासभा..! महापौरांच्याच नव्हे तर सर्वच नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात राहते, ती सभेतील गोडवा नव्हे तर अखेरच्या सभेत बºया-वाईट प्रस्तावांच्या असणाºया भरण्यामुळे. कोणतेही सोयीचे आणि गैरसोयीचे प्रस्ताव महापौरांच्या अखेरच्या महासभेत होतात. यंदा अशी सभेची संधी आली. महापौरांनी तर अखेरची सभा संस्मरणीय करण्यासाठी भोजनाचा घाट घातला म्हणे, परंतु दुर्दैव अखेरची सभाच तहकूब करण्याची वेळ महापौर रंजना भानसी यांच्यावर येणार आहे.
महापालिकेची किंवा स्थायी समितीच्या सभापतींची अखेरची सभा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याचे कारण शेवटच्या सभेत संबंधित पीठासन अधिकाऱ्यांना वाटणारे सोयीचे विषय घुसवले जातात. यात आरक्षणे उठवण्यापासून, ज्यादा दराची कामे मंजूर करणे, प्रशासन किंवा खाते प्रमुखांच्या सोयीचे प्रस्ताव मंजूर करणे असे अनेक विषय असतात. अत्यंत लाभाची कोणती सभा असेल तर ती अखेरची सभा. सत्तारूढ आणि विरोधक अशा अखेरच्या सभेत महापौरांचे गुणगान करतात आणि सहसा चुकीच्या कामालादेखील विरोध करत नाही. महापौरदेखील सर्वांच्या सहकार्यामुळे कसे (सोयीचे) काम करता आले त्याबद्दल कौतुक करतात. कोणाचा विरोध नाही की अडवणूक नाही. त्यामुळे अखेरची सभा खेळीमेळीत पार पडते.
महापौर रंजना भानसी यांच्या नशिबी मात्र असे गुणगान नाही. त्यांची मुदत १५ डिसेंबर रोजी संपणार होती. त्यामुळे मंगळवारी (दि.१९) होणारी ही एकच सभा नव्हे तर आणखी काही विषयांसाठी त्या सभा घेऊ शकत होत्या आणि सामान्यपणे मावळते महापौर अशा सभा घेतातच, परंतु शासनाचा २२ आॅगस्टचा एक अध्यादेश आड आला आणि सर्वच संपले. आरक्षणाच्या सोडतीनंतर अवघ्या
सात दिवसांत निवडणूक घ्यावी लागली. त्यामुळे महापौरांचा पक्ष असलेल्या भाजप बरोबरच बहुतांशी विरोधी पक्ष सहलीवर गेलेले
आहेत. त्यामुळे गणसंख्याच पूर्ण
झाली नाही तर सभा घेता येणार नाही की कोणताही प्रस्ताव मंजूर होणार नाही.
सभेचा अनोखा विक्रम
महापौरांच्या कारकिर्दीतील अखेरची सभा करण्याची नामुष्की आजपर्यंत कधी आली नव्हती. १९९२ पासून आत्तापर्यंत कधीही असे घडले नव्हते. मात्र हा विचित्र योग किंबहुना अखेरची सभा तहकूब करण्याचा विक्रम रंजना भानसी यांच्या नावावर लागणार आहे.

Web Title:  Tahkubi's disappointment at the last General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.