ताहाराबाद ग्रामपंचायतीत गैरव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 07:00 PM2019-07-12T19:00:15+5:302019-07-12T19:00:47+5:30
सटाणा तालुक्यातील ताहाराबाद येथील ग्रामपंचायतीच्या चौदा वित्त आयोग तसेच विविध योजनांचा निधी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो रु पयांच्या निधीचा गैरव्यवहार झाला आहे. परिणामी गावाचा विकास खुंटला असून, संबंधित विभागाने सखोल चौकशी करून ग्रामविकास अधिकाºयावर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सुभाष नंदन आपल्या कार्यकर्त्यांसह ताहाराबाद ग्रामपंचायत कार्यालयासमोर शुक्र वारपासून (दि.१२)आमरण उपोषण सुरू केले आहे.
सटाणा : तालुक्यातील ताहाराबाद येथील ग्रामपंचायतीच्या चौदा वित्त आयोग तसेच विविध योजनांचा निधी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो रु पयांच्या निधीचा गैरव्यवहार झाला आहे. परिणामी गावाचा विकास खुंटला असून, संबंधित विभागाने सखोल चौकशी करून ग्रामविकास अधिकाºयावर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सुभाष नंदन आपल्या कार्यकर्त्यांसह ताहाराबाद ग्रामपंचायत कार्यालयासमोर शुक्र वारपासून (दि.१२)आमरण उपोषण सुरू केले आहे.
जोपर्यंत ठोस आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत उपोषणावर ठाम राहणार असल्याचे सुभाष नंदन यांनी म्हटले असून, शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपासून सुरू झालेल्या या आमरण उपोषणस्थळी ताहाराबादवासीयांनी भेट देत पाठिंबा दिला आहे. ताहाराबाद ग्रामपंचायतीमध्ये विविध योजनांतर्गत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आढळून येत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. चौदा वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहार झाला असून, १५ टक्के दलित व आदिवासी आरक्षित निधी, १० टक्के महिला बालकल्याण निधी, ५ टक्के दिव्यांग निधी आरक्षित असताना गेल्या पाच वर्षांत या निधीचा वापरच झाला नसून त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. पाणीपुरवठा योजनेतही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, त्याची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल, पेट्रोल पंप, मोबाइल मनोरे, मद्याची दुकाने, व्यापारी संकुले यांची कर आकारणी शासनाच्या नियमानुसार होत नसल्याचेही निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. ग्रामपंचायत हद्दीत नवीन बिगर शेती प्लॉट यांना ना हरकत दाखला देताना शासनाच्या नियमांची ग्रामसेवकाकडून पायमल्ली केली जात आहे. तसेच ग्रामपंचायत बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून, त्याचीही चौकशी करण्यात यावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे. करण्यात आली आहे.
शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सुभाष नंदन यांच्यासह कैलास नंदन, गोविंद महाजन, मधुकर महाजन, अशोक नंदन, योगेश नंदन, गणेश नंदन, एकनाथ निहरे, यशवंत नवसार, उत्तम मानकर, योगेश पगारे, रोहिदास मानकर, कुणाल नंदन, गणेश नंदन, मधुकर महाजन, सुनील नंदन, बाळासाहेब महाजन, प्रशांत देशमुख, उत्तम मानकर, संदीप साळवे, मधुकर साळवे, अनिल गवळी, प्रभाकर भोसले आदींसह पन्नासहून अधिक जणांचा उपोषणात सहभाग आहे.
ग्रामपंचायत दप्तरात अपूर्तता
ताहाराबाद ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे यांना दप्तरात अपूर्तता आढळून आल्याने त्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केले होते; मात्र आजही दप्तर अहवाल पूर्ण नसताना त्यांना तालुक्यातच पुन्हा कार्यभार कसा देण्यात आला? असा सवाल करीत ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या गैरकारभारात दोषी असलेल्या भामरे व ग्रामपंचायत पदाधिकाºयांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ताहाराबाद ग्रामपंचायत ही ब वर्ग असताना या ठिकाणी ग्रामविकास अधिकाºयाची जागा असताना त्या ठिकाणी अर्थपूर्ण संबंध जोपासत ग्रामसेवकाकडे पदभार देण्यात आला आहे. याचीही चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.